जयंती,पुण्यतिथी अभिवादन
माजी.मंत्री विखेंनी प्रवरा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची दारे केली खुली-पुण्यस्मरण

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांसाठी शिक्षणाची दारे त्यांनी खुली करुन दिली. त्यातूनच पुढे प्रवरा अभिमत विद्यापीठाची स्थापना करण्यापर्यंत या संस्थेने झेप घेतली आसल्याचे प्रतिपादन गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी नुकतेच केले आहे.
“माजी मंत्री विखे यांनी शेती,सहकार,शिक्षण,ग्रामविकास अशा विविध क्षेत्रातील अनुभवाचा सामाजिक दायित्व म्हणून त्यांनी सर्वसामान्यांसाठी उपयोग केला.राज्य साखर संघ,राज्य डिस्टीलरी असोसिएशन,पद्मश्री डॉ.विखे पाटील कारखाना अशा मोठ्या सहकारी संस्थांवर अध्यक्ष म्हणून काम करताना विखे पाटलांनी सहकार क्षेत्र गतिमान करण्यास मोठे योगदान दिले”-राजेश परजणे,अध्यक्ष गोदावरी दूध संघ.सहजानंदनगर.
माजी केंद्रीय मंत्री पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त येथील गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या कार्यस्थळावर कोपरगांव तालुक्याच्यावतीने आदरांजली वाहण्यात आली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी पुष्पांजली अर्पण करुन स्व. डॉ. विखे पाटील यांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे.त्या वेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी अॅड. वाल्मिकराव काजळे यांचेही भाषण झाले. कार्यक्रमास नानासाहेब सिनगर,अशोकराव काजळे,राजेंद्र काजळे,भाऊसाहेब काळे,अजित कोरके,शरदराव शिंदे, उत्तमराव माने,संजय खांडेकर,सदाशिव कार्ले,भाऊसाहेब कदम,सुभाष होन,आंबादास वराडे, सोपान चांदर,रामदास रोहोम,खंडू फेपाळे,शिवाजीराव गायकवाड,बाळासाहेब दहे,सुदामराव भोसले,अरविंदराव जगताप,विजय ठाणगे,मनिष शहा,सचिन अजमेरे,वसंतराव जाधव,सयराम कोळसे,सुदामराव कोळसे,शिवनाथ खिलारी,प्रभाकर घाटे,दत्तात्रय शितोळे,बाळासाहेब सोनवणे, एस.के.थोरात यांच्यासह तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”माजी खा.विखे यांचा नगर जिल्ह्यासह राज्य व देशाच्या राजकारणात मोठा दबदबा होता.१९९५ साली स्व.आमदार गणपतराव देशमुख यांच्यासोबत महाराष्ट्र पाणी परिषदेची स्थापना करुन कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली.कोकणातले समुद्राला वाहून जाणारे पावसाचे पाणी गोदावरी खोऱ्याकडे वळविण्यासाठी तत्कालीन सरकारला सादर केलेला आराखडा मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे.हा आराखडा प्रत्यक्षात अंमलात आला तर संपूर्ण महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होण्यास मदत होणार आहे.शेती,सहकार,शिक्षण,ग्रामविकास अशा विविध क्षेत्रातील अनुभवाचा सामाजिक दायित्व म्हणून त्यांनी सर्वसामान्यांसाठी उपयोग केला.राज्य साखर संघ,राज्य डिस्टीलरी असोसिएशन,पद्मश्री डॉ.विखे पाटील कारखाना अशा मोठ्या सहकारी संस्थांवर अध्यक्ष म्हणून काम करताना विखे पाटलांनी सहकार क्षेत्र गतिमान करण्यास मोठे योगदान दिले.कोपरगांव तालुक्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते.स्व.नामदेवराव परजणे यांच्यासोबत कोपरगांव तालुक्यात दोन तीने वेळा पाणी व शेतकरी परिषदा आयोजित करुन सरकारचे लक्ष वेधून डॉ.विखे पाटील यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले असल्याचेही श्री परजणे पाटील यांनी सांगितले.
पुण्यतिथी कार्यक्रमात प्रारंभी अॅड. बाळासाहेब कडू पाटील यांनी प्रास्ताविक केले.तर उपस्थितीत कार्यकर्त्यांना ज्येष्ट कार्यकर्ते कैलास ठोळे यांनी मार्गदर्शन केले तर उपस्थितांचे आभार संवत्सर येथील उपसरपंच विवेक परजणे यांनी मानले आहे.