कोपरगाव तालुका
कोपरगाव न्यायालयात वकीलांसाठी मोफत वैद्यकीय शिबिर उत्साहात संपन्न
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव येथील न्यायालयातील वकिलांचे आरोग्य सयंत व निरोगी रहावे या साठी कोपरगाव वकील संघ व ठाणे येथील शिवनेर युथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच मोफत वैद्यकीय तपासणी व मोफत नेत्र चिकित्सा शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.त्यावेळी शिबिराचे उदघाटन जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री मांगले यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
वर्तमान धावपळीच्या व अस्थिर जीवनात माणसाचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे परिणामस्वरूप त्यास अनेक आजार,ताणतणाव यांचा सामना करावा लागत आहे.त्याला न्यायालयीन क्षेत्रात काम करणारा वकील हा घटकही अपवाद नाही.वर्तमानात त्यांच्यामागे अनेक ताणतणाव असल्याने स्वतःच्या आरोग्यकडे दुर्लक्ष होत असते हि बाब हेरून कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष शिरिषकुमार लोहकणे यांनी यासाठी ठाणे येथील शिवनेर युथ फाउंडेशनशी संपर्क साधून कोपरगाव न्यायालयात कार्यरत वकीलासांठी या शिबिराचे आयोजन केले होते.त्याला 156 वकिलांनी प्रतिसाद दिला आहे.व आपल्या सर्व आरोग्याच्या तपासण्या करून घेतल्या आहेत.
सदर प्रसंगी उपवरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्या. सचदेव,न्या. श्री मिसाळ. न्या. श्री पांचाळ,न्या. डोईफोडे,सहकार न्यायालयाचे न्या. श्री पाटील आदी प्रमुख मान्यवरांसह वकील संघाचे अध्यक्ष शिरिषकुमार लोहाकणे, उपाध्यक्ष गौरव गुरसळ, महिला उपाध्यक्षा शीतल देशमुख,सचिव नितीन खैरनार,माजी अध्यक्ष जयंत जोशी,शंतनू धोर्डे,एस.एम.वाघ,मच्छीन्द्र खिलारी,महेश सोनवणे,अशोक वहाडणे,नरेंद्र संचेती,अशोक टुपके,दिलीप लासुरे,बाळासाहेब कडू,योगेश खालकर, विद्यासागर शिंदे,ए. जी.दारुवाला,एम.एल.मोरे,संजय भोकरे,एम.पी.येवले.व्ही.टि. सुपेकर आदींसह बहुसंख्येने वकील उपस्थित होते.