कोपरगाव तालुका
कोपरगाव स्वच्छता मोहिमेला यश,नागरिकांनी केला अध्यक्ष,मुख्याधिकारी यांचा सत्कार
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव ( प्रतिनिधी )
कोपरगाव नगरपरिषदेने गत तीन वर्षात शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी केलेल्या मेहनतीला नुकतेच फळ प्राप्त झाले असून या मोहिमेचे यश मिळून पालिकेला तपासणी पथकाने केलेल्या शिफारशीप्रमाणे ओ. डी. एफ.चे दुहेरी पदमानांकन प्राप्त झाल्याने नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे ,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा अभियंता रवींद्र सोमोसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकताच सत्कार केला आहे.
देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे या करिता या शहरांना स्वच्छतेची आणि या शहरामधील सर्व नागरीकांना शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देवून हे ध्येय गाठण्यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, हे अभियान 2 ऑक्टोंबर, 2014 पासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जन्मदिनापर्यंत म्हणजे 2 ऑक्टोंबर 2019 पर्यंत कोपरगावसह संपूर्ण देशात राबविण्यात आले होते.
कोपरगाव नगरपरिषदेने अधिकारी सर्वच अधिकारी व आरोग्य विभागासह सर्वच कर्मचाऱ्यांनी गेल्या 3 वर्षांपासून केलेल्या परिश्रमाला यश नुकतेच यश मिळाले असून हागणदारी मुक्तीत कोपरगाव नगरपरिषदेला ओडीएफ प्लस प्लस मानांकन मिळाले आहे.त्यासाठी शहरातील नागरीकांनी मोठे सहकार्य केले होते.त्याचे चांगले परिणाम मिळून आले असून यात नगराध्यक्ष विजय वहाडणे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, आरोग्य व स्वच्छता विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका निभावली होती याची जाणीव ठेवत कोपरगाव शहरातील नागरिकांनी सेवा निवृत्त अभियंता रवींद्र सोमोसे, यांच्या पुढाकाराने नुकताच नागरिकांनी अध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचा सत्कार केला आहे.त्यावेळी नंदू तांबट,मच्छीन्द्र पठाडे, शंकर खंडांगळे, बापू ढोमसे, आप्पासाहेब देवकर, अशोक नाईक, टि. टि. शिंदे,के.एस.पांडे.पी.एम.पाटील.आदी प्रमुख मान्यवरांसह बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.