कोपरगाव तालुका
कोपरगावात ‘कोविड पच्छात आजार’ शिबिर संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील डॉ.घायतडकर डेंटल क्लिनिकच्या वतीने कोविड पश्चात होणाऱ्या आजारांसंदर्भात घ्यावयाची काळजी याबाबत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उदघाटन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले आहे.
सदर प्रसंगी प्रास्तविक डॉ.कुणाल घायतडकर यांनी केले त्या वेळी ते म्हणाले की,”कोरोना हा जीवघेणा आजार असून आजही कोरोनाचे रुग्ण जरी सापडत असले तरी ते प्रमाण इतर तालुक्याच्या तुलनेत कोपरगाव मध्ये निश्चितपणे कमी आहे.तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी आरोग्य विभागाला वेळेत मदत उपलब्ध करून दिल्यामुळे आरोग्य विभागाचे काम अतिशय सोपे झाले.त्यामुळे बाधित रुग्णाच्या संपर्कातील शेवटच्या नागरिकांपर्यंत आरोग्य विभाग पोहोचत असून कोरोना संसर्ग रोखण्यात मदत मिळाली आहे.
या वेळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अरूण चंद्रे,कोपरगाव पंचायत समिती सदस्य अनिल कदम,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,राजेंद्र वाकचौरे,फकीर कुरेशी,डॉ.तुषार गलांडे,डॉ.दीपक पगारे,डॉ. राजेंद्र वाघडकर,डॉ.संदीप वाबळे,डॉ.आसिफा पठाण,डॉ.दिपाली आचारी,डॉ.रणदिवे,शिवाजी घायतडकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अरूण चंद्रे व रोहिणी घायतडकर यांनी केले तर आभार डॉ.भाग्यश्री घायतडकर यांनी मानले आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अरूण चंद्रे व रोहिणी घायतडकर यांनी केले तर आभार डॉ.भाग्यश्री घायतडकर यांनी मानले आहे.