जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

क्रेडाई संघटनेच्या माध्यमातून शहराचा चेहरामोहरा बदलणार-फुर्दे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

बांधकाम क्षेञाशी निगडीत असलेल्या क्रेडाई संघटनेच्या माध्यमातून राज्यातील छोट्या मोठ्या शहरांचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य क्रेडाई संघटनेचे अध्यक्ष सुनिल फुर्दे यांनी कोपरगाव येथे एका कंर्यक्रमात बोलताना केले आहे.

कोपरगाव येथील हाॅटेल विरा पॅलेसच्या सभागृहात कोपरगाव-शिर्डी क्रेडाई संघटनेच्या पदाधिकारी सदस्यांची बैठक राज्याचे अध्यक्ष सुनिल फुर्दे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष प्रमोद खैरनार,राज्य सचिव सुनिल कोतवाल,सहसचिव संजय गुगळे,क्रेडाई अहमदनगरचे अध्यक्ष अमित मुथा, कोपरगाव-शिर्डीचे अध्यक्ष प्रसाद नाईक,पदाधिकारी दिनार कुदळे,किसन आसने,राहुल भारती,संदीप राहतेकर,आनंद अजमेरे,प्रदिप मुंदडा,सिध्देश कपिले,हिरेन पापडेजा,यश लोहाडे,अक्षय जोशी,मनिष फुलफगर,सचिन बोरावके,याकुब शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”एखाद्या शहराचा विकास कसा होवू शकतो किंवा त्याची नवी ओळख निर्माण करण्याचे खरे काम बांधकाम व्यावसायीक करीत असतात.सध्या बांधकाम व्यावसायिकांना जी.एस.टी.,शहर नियोजन विकास,कर प्रणाली तसेच विविध शासकीय किचकट अटीशर्तीने बेजार केले आहे.शासकीय विविध प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी राज्य व केंद्रींय पातळीवर प्रयत्न करून बांधकाम व्यावसायिकांना दिलासा देणार असल्याचे सांगितले.शहराच्या सकारात्मक बलस्थानावर बांधकाम व्यावसायिकांनी सामुहिक विचाराने योग्य काम केल्यास बांधकाम व्यवसाय अधिक वाढू शकतो. कोपरगाव शहराच्या अनेक समस्या असतानाही येथील बांधकाम व्यवसायीकांनी योग्य काम करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोपरगाव-शिर्डी शहात क्रेडाई संघटनेचे काम कौतुकास्पद असुन राज्यातील इतर संघटनांना दिशादर्शक असल्याचेही ते शेवटी म्हणाले आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव शिर्डी क्रेडाईचे अध्यक्ष प्रसाद नाईक यांनी कोपरगाव शिर्डी परिसरातील बांधकाम व्यावसायिकांच्या विविध समसस्या मांडताना म्हणाले की,”कोपरगाव शहर हे राजकीय,सामाजीक,भौगोलिक,शैक्षणिक,सांस्कृतिक,अध्यात्मीक वारसा असलेले शहर असुन शहराच्या काही अंतरावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ आहे,देशातला सर्वात मोठा महामार्ग अर्थात समृध्दी महामार्ग जवळून जातोय,नावाजलेल्या विविध शैक्षणिक संस्था असल्याने कोपरगाव शहरात बांधकाम व्यवसायीकांना चांगली संधी आहे.माञ नवीन बांधकाम नियमावली नुसार राज्यात व कोपरगाव शहरात टीडीआर पद्धत बांधकामासाठी लागू झाली परंतु नगर परिषद व टाऊन प्लॅनिंग अहमदनगर यांच्यामध्ये समन्वय नसल्याने तसेच अधिकाऱ्यांना योग्य ट्रेनिंग नसल्याने बांधकाम व्यावसायीकांना अनेक अडचणी येत आहेत.तरी त्या संदर्भात लवकरात लवकर निर्णय होऊन कोपरगावात बहुमजली इमारती चा मार्ग मोकळा व्हावा अशी मागणी केली.
यावेळी राज्याचे सचिव सुनिल कोतवाल,सहसचिव संजय गुगळे आदींनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजेश ठोळे यांनी केले तर चंद्रकांत कौले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close