कोपरगाव तालुका
कोपरगावात दिव्यांग भवन निर्माण करून देणार-आश्वासन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील दिव्यांग बंधूंना कोपरगावात भूखंड उपलब्ध झाल्यास आपण आपल्या स्थानिक विकास निधीतून दिव्यांग सामाजिक भवन निर्माण करून देऊ असे स्पष्ट आश्वासन कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी आज कोपरगाव येथील कृष्णाई मंगल कार्यालयात एका कार्यक्रमात बोलताना दिले आहे.
समाजातील दृष्टीहीन,कर्णबधिर,अस्थिव्यंग,मनोविकलांग व कुष्ठरोगमुक्त अपंग व्यक्तींकडे त्यांच्या अपंगत्वाकडे न पाहता त्यांच्यामध्ये असलेल्या सामर्थ्यांकडे पाहून त्यांच्या मधील असलेले सुप्त सामर्थ्य विकसित करुन त्यांना समाज जीवनाच्या सर्व अंगामध्ये समान संधी,संपूर्ण सहभाग व त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय,तसेच इतर विविध विभागांमार्फत कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.त्याचा लाभ देण्यासाठी या कार्यक्रमाचे कोपरगावात आयोजन करण्यात आले होते.
समाजातील दृष्टीहीन,कर्णबधिर,अस्थिव्यंग,मनोविकलांग व कुष्ठरोगमुक्त अपंग व्यक्तींकडे त्यांच्या अपंगत्वाकडे न पाहता त्यांच्यामध्ये असलेल्या सामर्थ्यांकडे पाहून त्यांच्या मधील असलेले सुप्त सामर्थ्य विकसित करुन त्यांना समाज जीवनाच्या सर्व अंगामध्ये समान संधी,संपूर्ण सहभाग व त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय,तसेच इतर विविध विभागांमार्फत कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्याचप्रमाणे सामाजिक सुरक्षिततेसाठी अपंगांना काही क्षेत्रामध्ये आरक्षण,सवलती,सूट व प्राधान्य देण्यात आलेले आहे.त्याचा परिचय व्हावा व वैश्विक कार्डाचे वाटप करण्याचा कार्यक्रम कोपरगावात आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते..सदर प्रसंगी कोपरगाव पंचायत समिती सभापती पोर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक बाळासाहेब बारहाते,गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते,महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,जिल्हा परिषदेच्या सदस्या सोनाली साबळे,पंचायत समिती सदस्य श्रावण आसने,बाजार समितीचे माजी सभापती मधुकर टेके,अनिल कदम,रोहिदास होन,नगरसेवक मंदार पहाडे,मेहमूद सय्यद, राजेंद्र वाकचौरे,गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार,लायन्स मूकबधिर विद्यालयाचे संचालक संदीप रोहमारे,फकीर कुरेशी,रमेश गवळी,अपंग प्रहार संघटनेचे परमेश्वर कराळे,नारायण गुरसळ,भास्करराव डुकरे,पप्पू वीर,पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी पंडितराव वाघिरे आदी मान्यवरांसह बहुसंख्य दिव्यांग नागरिक,महिला उपस्थित होत्या.त्यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”कोणत्याही एका गोष्टीची उणीव आपल्याला यश मिळविण्यापासून दूर नेऊ शकत नाही.एक बाजू कमकुवत जरी असली तरी त्याची भरपाई करण्यासाठी निसर्गाने एक गुण जास्त बहाल केलेला असतो याची खात्री बाळगा. मनाचा दृढ निश्चय करून काम करायचे ठरवले तर दिव्यांग बांधव सर्वसामान्य व्यक्तीपेक्षाही उत्कृष्ट कामगिरी निश्चितपणे करू शकतात.त्यामुळे दिव्यांग असल्याचे मनातून काढून टाका जे काम हाती घेतले आहे त्या कामावर विलक्षण निष्ठा ठेवा तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही.दिव्यांग बांधवांना दैनंदिन जीवनात कोणत्या अडचणी येतात याची मला जाणीव असून या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत कोपरगाव मध्ये दिव्यांग भवन बांधण्याचा मानस आ.काळे यांनी व्यक्त केला.