जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्याला तातडीने शेतीसाठी आर्वतनाची गरज-सेना नेते शिंदे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगावसह राहाता तालुक्यातील गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात वर्तमानात पावसाने ओढ दिली असून अनेक खरीप पिके पावसाअभावी सुकू लागली आहे त्यामुळे जलसंपदा नाशिक विभागाने तातडीने खरीप पिके वाचविण्यासाठी आवर्तन द्यावे अशी महत्वपूर्ण मागणी सेनेचे संपर्क नेते प्रवीण शिंदे यांनी केली आहे.

“खरिप पिकांसाठी न नं. ७ फार्म भरण्यासाठी दि. १४ ऑगस्ट २०२१ ही शेवटची मुदत ठेवली आहे. त्यानंतर पानी सोडण्यात येईल व त्याची तारीख ही पाटबंधारे विभागतर्फे नंतर जाहीर केली जाईल तसेच पाण्याचा प्राधान्य क्रम लक्षात घेता प्रथम पिण्यासाठी गृहीत धरल्यास शेतीसाठी पाणी मिळण्यास आणखी किमाण १५ ते २० दिवस विलंब होणार आहे तोपर्यंत हातातील खरीप पिके जाळून जाण्याचा धोका आहे”-प्रवीण शिंदे,सम्पर्क प्रमुख शिवसेना.

वर्तमानात जवळपास १५ ते २० दिवसापासून गोदावरी कालव्यावरील लाभक्षेत्रात पावसाने ओढ दिली आहे.व सध्या वाहणाऱ्या जोराच्या वाऱ्यामुळे सोयाबीन तसेच मका यांना तात्काळ पाण्याची गरज आहे.जलसंपदा विभागामार्फत खरिपा साठी प्रगटन जाहीर केले आहे व खरिप पिकांसाठी न नं. ७ फार्म भरण्यासाठी दि. १४ ऑगस्ट २०२१ ही शेवटची मुदत ठेवली आहे. त्यानंतर पानी सोडण्यात येईल व त्याची तारीख ही पाटबंधारे विभागतर्फे नंतर जाहीर केली जाईल तसेच पाण्याचा प्राधान्य क्रम लक्षात घेता प्रथम पिण्यासाठी गृहीत धरल्यास शेतीसाठी पाणी मिळण्यास आणखी किमाण १५ ते २० दिवस विलंब होणार आहे. व तोपर्यंत सर्वदूर पाऊस न पडल्यास हाताशी येणारी जवळपास दिडमहीना वयाची पिके वरती धरणात पाणी असताना शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याची शक्यता आहे. या वर्षी या आधी शेतकऱ्याने केलेली पेरणी एकदा वाया गेलेली आहे व ही दुबार पेरणी असून ही देखील वाया जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे शेतकऱ्यांवर आता फार मोठे आर्थिक संकट ओढावणार आहे तरी शेतकऱ्यांसाठी ताबडतोब पाण्याचे आर्वतन सोडावे. तसेच या आधी पिण्याचे आर्वतन झाले असलामुळे आर्वतन थेट शेतकऱ्यांना प्रथमतः दयावे व नंतर पिण्यासाठी दयावे. किमान पाणी वेळेवर मिळून उभी पिके वाचविण्यास मदत होईल असे आवाहन संपर्क नेते प्रवीण शिंदे यांनी जलसंपदा विभागाला शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close