कोपरगाव तालुका
भोजडेत वीरभद्र यात्रोत्सव जंगी कुस्त्यांसह उत्साहात संपन्न,
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर अशा श्री क्षेत्र भोजडे येथील ग्रामदैवत श्री वीरभद्र महाराज यात्रोत्सव १०० वर्षांपासूनच्या दरवर्षी १२ गाड्या ओढण्याचा कार्यक्रमासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
या यात्रोत्सवात कुठलाही अवाजवी खर्च न करता भोजडे यात्रा समितीच्या वतीने यात्रोत्सवातील उर्वरित वर्गणी दहेगाव येथील नुकतेच देशाच्या सीमेवर शहीद झालेले जवान स्व.सुनिल वलटे यांच्या कुटुंबियांना देण्यात आल्याने भोजडे ग्रामस्थांनी संपूर्ण समाजापुढे वेगळा आदर्श ठेवलेला आहे त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भोजडे येथे भगवान वीरभद्र हे भोजडे गावाचे आराध्य दैवत आहे.भगवान शिवांचे वीरभद्र हे गण मानले जातात.त्यांच्यावर या भोजडे व परिसरातील भाविकांची मोठी श्रद्धा आहे.त्यामुळे या दैवताच्या यात्रा उत्सवात भाविकभक्त मोठ्या उत्साहाने सामील होतात. या यात्रोत्सवात सालाबादप्रमाणे याही वेळी आयोजित भव्य कुस्ती साखळी स्पर्धेत भोजडे नं.२ सोसायटी, वसंतदादा मल्टीस्टेट व भोजडे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थापक चेअरमन कै. सिताराम सिनगर यांच्या स्मृती प्रित्यर्थ विजेते कुस्तीवीर मयूर चांगले, रा.को-हाळे यांना “भोजडे श्री” व कै. प्रविण गोंदकर पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ विजेते कुस्तीवीर अनिल वाघ, रा. नांदगाव यांना “भोजडे केसरी” देऊन गौरविण्यात आले आहे. यावेळी अनेक जिल्ह्यातून जवळजवळ ५० उत्तम कुस्तीवीरांनी सहभाग नोंदवला होता. अखेर अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात पॉईंट वरून विजेते घोषित करण्यात आले. विजयी कुस्तीवीरांना संयोजक संस्थेचे अध्यक्ष मुकुंद सिनगर यांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले आहे.
यावेळी सरपंच दत्तात्रय सिनगर, उपसरपंच अजित सिनगर,सदस्य विक्रम सिनगर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, उपतालुकाप्रमुख सुरेश गिरे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाप्रमुख चारुदत्त सिनगर, भाजपा जेष्ठ नेते साहेबराव सिनगर, कैलास धट यांच्यासह यात्रा कमिटीचे सर्व सदस्य, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य समवेत जेष्ठ नेते संभाजी सिनगर, उपाध्यक्ष रावसाहेब सिनगर, संचालक शंकर सिनगर, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे उपजिल्हाप्रमुख सुधाकर वादे, प्रगतिशील शेतकरी धोंडीराम धट, मधुकर वादे,दिलीप सिनगर, गणेश वाळुंज,प्रभाकर सिनगर, अशोक वडाळकर, अविनाश मोरे, शंकर पवार, दगु पवार, सह समस्त ग्रामस्थ भोजडे व पंचक्रोशीतील कुस्ती प्रेमी नागरिक उपस्थित होते.अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत विजय श्री खेचून आणणाऱ्या पैलवानांचे सर्वच स्तरातून हार्दिक अभिनंदन केले जात आहे.