कोपरगाव तालुका
उत्तर काशीचे पवित्र गंगाजल कोपरगावात दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील गोदावरी तीरावर संत-महंत यासह या परिसरातील अध्यात्मिक महत्व आणि लवकरच सुरु होत असलेला पवित्र श्रावणमास यानिमित्ताने भारत सरकारचे टपाल विभागाकडे स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी गंगाजल करिता मागणी नोंदविली.त्यानुसार टपाल विभागाने गंगाजल उपलब्ध करून देण्यात आले आहे.या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भारतीय डाक विभागाने श्रावण महिन्यामध्ये खास देशातील सर्व नागरिकांसाठी पवित्र असणारे गंगाजल आता संपूर्ण देशात पोस्टामार्फत उपलब्ध करून दिले आहे.भारतीय टपाल विभागाने ओळखून गंगा नदीचे जल २५० मिली गंगाजल बंद बाटली द्वारे ३० रुपये दरात भारतीय टपाल खात्याने कार्यालयात उपलब्ध करून दिले आहे कोपरगावात नागरिकांनी त्याचे स्वागत केले आहे.
शिव उपासक आणि हिंदू विधीत काशी तीर्थ स्नानाला विशेष महत्त्व आहे.भारतीय संस्कृती मध्ये गंगा नदीचे जल म्हणजे पवित्र जल मानले जाते.अनेक धार्मिक विधी मध्ये या गंगा नदीच्या पवित्र पाण्याला खूप महत्त्व आहे. परंतु हे जल प्रत्येकाला सहजासहजी आपल्या घरामध्ये उपलब्ध करता येत नाही. नागरिकांची ही गरज लक्षात घेऊन भारतीय डाक विभागाने श्रावण महिन्यामध्ये खास देशातील सर्व नागरिकांसाठी पवित्र असणारे गंगाजल आता संपूर्ण देशात पोस्टामार्फत उपलब्ध करून दिले आहे.भारतीय टपाल विभागाने ओळखून गंगा नदीचे जल २५० मिली गंगाजल बंद बाटली द्वारे ३० रुपये दरात भारतीय टपाल खात्याने कार्यालयात उपलब्ध करून दिले आहे.हे मागविण्यात आलेले गंगाजल सर्वप्रथम ग्रामदैवत गोकर्ण गणेश देवस्थान,तसेच महादेव देवस्थान येथे वितरण करण्यात येणार आहे.श्रावण महिन्यामध्ये नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध होणार असल्याचे अहमदनगर डाक विभागाचे वरिष्ठ अधिक्षक एस.रामकृष्णा,डाक निरीक्षक संदिप हदगल यांनी कळवले आहे.श्रावणात नागरिकांना भारतीय डाक कार्यालय,कोपरगाव येथे सकाळी ९:०० ते २:०० कार्यालयीन वेळेत उपलब्ध असणार बाबत डाक विभागाने कळवले आहे.
उत्तर काशीचे पवित्र गंगाजल स्विकारण्यासाठी टपाल विभागाने श्रीमंत पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थान महादेव मंदिर देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके यांना निमंत्रित केले आहे.
सदर गंगाजल तिर्थाचे विक्री वितरण प्रसंगी श्रीमंत पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे जनरल मुखत्यार महेंद्र पाटील,श्री दत्तपार देवस्थान व श्री स्वामी समर्थ केंद्राचे विश्वस्त अॅड.जयंत जोशी,प्रसिद्ध व्यापारी नारायणशेठ अग्रवाल,माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील,डाकपाल राजेंद्र नानकर,राजेश नेतनकर,कोषागार शैलैश शिलवंत,प्रमोद कवाडे,नितीन वाघमारे,रविंद्र परदेशी,सोपान गडाख,ज्ञानदेव पगारे,बापू चव्हाण,सोमनाथ तांगतोडे,दिपक गवारे यांचे सह डाक कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.