कोपरगाव तालुका
कोपरगावातील…या उद्योग समूहाची पुरग्रस्तांना मदत
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगावात सामाजिक सेवाभावी कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या ठोळे उद्योग समूहाची पुरग्रस्तांसाठी नुकतीच मोठी मदत कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचेकडे सुपूर्द केली आहे.त्यांच्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
महाराष्ट्रात सहा ते सात जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे.राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसान झालं आहे.सातारा,रत्नागिरी,सिंधुदूर्ग,सांगली, कोल्हापूर,रायगड अशा एकूण सात जिल्ह्यांसहित अन्य जिल्ह्यातही नुकसान झालं आहे.त्यांना मदत करण्याची गरज आहे हि गरज ओळखून कोपरगाव शहराचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उद्योजक राजेश ठोळे यांनी हा प्रतिसाद दिला आहे.
महाराष्ट्रात सहा ते सात जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे.राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसान झालं आहे. सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सांगली, कोल्हापूर, रायगड अशा एकूण सात जिल्ह्यांसहित अन्य जिल्ह्यातही नुकसान झालं आहे.त्यांना मदत करण्याची गरज आहे.पूरस्थिती अहवाल आल्यानंतर राज्य सरकार अंतिम धोरण जाहीर करुन जबाबदारी जाहीर करणार आहे.राज्यात उद्भवलेल्या पुरामुळं सोळा हजार कुटुंब उद्ध्वस्थ झाली आहेत.तर चिपळूण,खेडमधील पाच हजार, रायगड महाडमधील पाच हजार,कोल्हापुरातील दोन हजार,सातारामधील एक हजार आणि सांगलीतील दोन हजार लोकांना फटका बसला आहे.त्यामुळे या नागरिकांना तातडीची मदत लागणार आहे.त्यासाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी शहरातील व्यापाऱ्यांना निमंत्रित करून या आपदग्रस्त नागरिकांना मदत अकरण्याचे आवाहन केले होते त्याला अनेक नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे.त्यातच कोपरगातील उद्योजक राजेश ठोळे यांनी प्रतिसाद देत हि मदत जाहीर केली आहे. रत्नागिरी चिपळूण येथे आलेल्या महापुरात अनेक संसार प्रपंच वाहून गेले प्रचंड हानी झाली पुरग्रस्तांना मदत गरजेची आहे याची जाणीव संवेदनशील मनाने जाणून ठोळे उद्योग समूहाचे राजेश ठोळे यांनी एकावन्न हजार रुपये मदतीचा धनादेश पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचेकडे सुपूर्द केला आहे.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.