कोपरगाव तालुका
साहित्यिकाला एखादी घटना प्रेरणा देते-कौतुक
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
साहित्यिकाला एखादी घटना किंवा एखादा शब्द प्रेरणा देतो त्यातून एखादी कलाकृती जन्माला येते व समाजातील सर्व घटकांचे मन जिंकून घेत असल्याचे प्रतिपादन कोपरगाव येथील साहित्यिक डॉ.तुषार गलांडे यांनी कोपरगाव येथे बोलताना केले आहे.
कोपरगाव येथील विद्यार्थिनी कु.श्वेताम्बरी रमेश राऊत यांनी नुकतेच प्रसिद्ध गीतकार बाबासाहेब गीतकार यांचे आत्मचरित्र ‘पायपोळ’या आत्मचरित्रावर आधारित प्रबंध एम.फिल.साठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सादर केला होता.त्यातून विद्यापीठाने त्यांना एम.फिल.पदवी बहाल केली आहे.त्यांना कोपरगाव येथील प्रा.शीला गाढे यांचे मार्गदर्शन लाभले होते.त्यांना एम फिल मिळाल्याबद्दल त्यांचा नुकताच चंद्रमा कलर लॅब मार्फत सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी वात्रटिकाकार अविनाश पाटील,रवींद्र साबळे,किरण कासार,आदी मान्यवर उपस्थित होते.त्यावेळी या सत्काराबद्दल कु.श्वेताम्बरी राऊत यांनी आभार मानले आहे.उपस्थितांचे आभार मंगल भवर यांनी मानले आहे.