कोपरगाव तालुका
आत्मा मालिक अकॅडमी तर्फे विद्यार्थ्यांना मोफत सवलत,उपक्रमाचे कौतुक
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी कोकमठाण येथील आत्मा मालिक करिअर अकॅडमीतर्फे स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी 10 नोव्हेंबरला राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या धर्तीवर परीक्षा होणार असून, यात गुणवत्ता यादीत येणा-या 100 विद्यार्थ्यांना हे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
आत्मा मालिक करिअर अकॅडमी मधून आत्तापर्यंत 130 पेक्षा अधिक विद्याथ्र्याची शासनाच्या विविध पदावर निवड झालेली आहे. अधिकरी सुज्ञ, सुसंस्कृत असावा, परंतु त्याला नैतीक मुल्ये देखील असावीत. नैतीक मुल्यांची जोपासना करणारे अधिकारी या अकॅडमी मधुन देशभरात अधिकारी व्हावे अशी आत्मा मालिक माउली व सकल संतगणाची इच्छा आहे. यापुढेही चांगले अधिकारी अकॅडमीमधून बाहेर पडावेत म्हणून अकॅडमीचे पदाधिकारी कार्यरत आहे. अधिक माहितीसाठी 7875719690/9100049302 या क्रमांकवर संर्पक साधून ग्रामीण व शहरी भागातील होतकरू गरीब विद्याथ्र्यांना लाभ घ्यावा असे आवाहन आश्रम ट्रस्टचे सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे यांनी केले आहे.