कोपरगाव तालुका
“हॉस्पिटल ओम” अँप भविष्यात महत्वाची भूमिका निभावेल-आशावाद
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
विषाणूजन्य साथीच्या प्रतिकूल कालखंडात वेळेत योग्य माहिती उपलब्ध असणे गरजेचे असून अशा प्रकारच्या जीवघेण्या संकटात आरोग्यविषयक सूक्ष्म माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार असून भविष्यात हॉस्पिटल ओम अॅप महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास कोपरगाचे आ.आशुतोष काळे यांनी नुकताच व्यक्त व्यक्त केला आहे.
या अॅपच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यातील सर्व डॉक्टर्स व हॉस्पिटल्सविषयी सर्व माहिती नागरिकांना घरबसल्या मिळणार आहे.अॅपचे निर्माते प्रीतम महावीर संघवी यांनी महाराष्ट्रातील सर्व ३५७ तालुक्यांसाठी हे अॅप सुरू करण्याचा संकल्प केला असून त्यांच्या या कामासाठी आ. काळे यांनी त्यांना मतदार संघातील जनतेच्या वतीने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.
कोपरगाव मध्ये प्रथमच एमएच ३५७ (MH 357) या कंपनीची स्थापना करून कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना आरोग्यविषयक सोयी-सुविधांची उपलब्धता या विषयी सखोल माहिती देणाऱ्या “हॉस्पिटल ओम”या अॅपचा शुभारंभ नुकताच आ.काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,नगरसेवक मंदार पहाडे,राजेंद्र वाकचौरे,गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार,डॉ.भरत संघवी,डॉ.विजय संघवी,डॉ.कृष्णा फुलसुंदर,डॉ.चंद्रशेखर आव्हाड,डॉ. राजेंद्र चीने,डॉ.योगेश कोठारी,डॉ.मयूर जोर्वेकर,डॉ.मयूर तिरमखे,डॉ.आतिष काळे,डॉ.कुणाल घायतडकर,डॉ.सुनील लोढा,युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे, फकीरमामु कुरेशी,दिनकर खरे,राहुल देवळालीकर,जावेद शेख,अॅड.मनोज कडू,गणेश लकारे, वाल्मिक लहिरे, धनंजय कहार, संदीप देवळालीकर,इम्तियाज अत्तार,जुनेद शेख,संतोष बारसे,नितीन जोरी,अमोल देवकर,विलास नरोडे,गोरख कानडे,प्रताप गोसावी,महेश उदावंत,योगेश वाणी,रवींद्र छाजेड,जितेंद्र छाजेड आदी उपस्थित होते.
या अॅपच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यातील सर्व डॉक्टर्स व हॉस्पिटल्सविषयी सर्व माहिती नागरिकांना घरबसल्या मिळणार आहे.अॅपचे निर्माते प्रीतम महावीर संघवी यांनी महाराष्ट्रातील सर्व ३५७ तालुक्यांसाठी हे अॅप सुरू करण्याचा संकल्प केला असून त्यांच्या या कामासाठी आ. काळे यांनी त्यांना मतदार संघातील जनतेच्या वतीने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधित झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना उपचाराच्या दृष्टीने अनेक गोष्टींची माहिती मिळविण्यासाठी विविध हॉस्पिटलशी संपर्क करावा लागत होता.एकीकडे मोठ्या प्रमाणात वाढलेले रुग्ण त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरचा वाढलेला ताण अशा परिस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. कोरोना बाधित रुग्णांना बाधा झाल्यांनतर योग्य मार्गदर्शन,सुविधा व औषधोपचार मिळाल्यास तो रुग्ण निश्चितपणे बरा होतो असेही त्यांनी शेवटी सांगितले आहे.