कोपरगाव तालुका
कोपरगाव पालिका सेवानिवृत्त शिक्षक वेतन अनुदानापासून वंचित
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषद शिक्षक कर्मचारी हे गतवर्षीपासून शिक्षण मंडळाने दहा टक्के वेतन अनुदानापासून वंचित ठेवले असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य नगरपरिषद शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आला आहे.त्याबाबत आज नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांना त्या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.
“कोपरगाव नगरपालिका शिक्षण मंडळातील शिक्षकांना दहा टक्के वेतन व पेन्शन अनूदान स्थानिक नगरपरिषद देत असते परंतु सप्टेंबर २०२० पासून सदर अनुदान कोपरगाव नगरपरिषदेने दिलेले नाही.त्यामुळे अनेक शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे”-साहेबराव वाघ,सेवानिवृत्त नगरपरिषद शिक्षक संघ.
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद शिक्षक संघाच्या कोपरगाव शाखेच्या वतीने नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे त्यानी म्हटले आहे की,”कोपरगाव नगरपालिका शिक्षण मंडळातील शिक्षकांना दहा टक्के वेतन व पेन्शन अनूदान स्थानिक नगरपरिषद देत असते परंतु सप्टेंबर २०२० पासून सदर अनुदान कोपरगाव नगरपरिषदेने दिलेले नाही.त्यामुळे अनेक शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.कोपरगाव शिक्षण मंडळाने पुणे येथील शिक्षण उपसंचालक यांचेकडून मिळालेल्या नव्वद टक्के वेतन अनुदानातून ९० टक्के वेतन केल्यामुळे शिक्षकांनी विविध कर्जाचे हप्ते भरु शकलेले नाही.त्याना विनाकारण कर्जाचा भुर्दंड सोसावा लागत आहे.या खेरीज इतर कपातीमुळे निव्वळ अदा वेतनही कमी मिळत आहे.अशा आर्थिक जाचात शिक्षक सापडले आहे.तरींही कोपरगाव नगरपरिषदेने थकीत वेतन व पेन्शन अनुदान त्वरित कोपरगाव शिक्षण मंडळास अदा करावे असे आवाहन त्यानी शेवटी केले आहे.
या निवेदनावर साहेबराव वाघ,प्रकाश जमधडे,मनोहर इंगळे,रवींद्र आमले,भरत आगळे,मंगल बिबवे,दिलीप बर्डे,विलास माळी,सुनील रहाणे,मुबशीर खान,दस्तगिर कुरेशी,आदींनी सह्या केल्या आहेत.त्यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे हे हि उपस्थित होते.