जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

सरपंचाने विश्वासात घेतले नाही,जवळकेत उपसरपंचाचा राजीनामा,कार्यक्रमावर बहिष्कार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायतीचे सरपंच बाबुराव थोरात यांनी ग्रामपंचायत इमारतीच्या उद्या सकाळी आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न होणाऱ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमास कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतले नाही या कारणावरून जवळके ग्रामपंचायतच्या महिला उपसरपंच मंदाबाई सुधाकर थोरात यांनी नुकताच राजीनामा दिला असून त्यांनी आपल्या समर्थक सदस्यांसह या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला असून कोपरगाव तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या ग्रामपंचायतीची तीन वर्षांपूर्वी निवडणूक संपन्न झाली होती त्या नंतर एप्रिल महिन्यात त्यांच्या विरोधात सहा सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता.त्यात सरपंच यांनी या सदस्यांना विश्वासात घेतले नाही,अधिकाराचा दुरुपयोग,कर्तव्यात कसूर करणे,विकास कामांचा अभाव,ग्रामपंचायतीच्या ठरावाची अंमलबजावणी न करणे,पंचायतीच्या कामकाजात दिरंगाई करणे आदी कारणे यात दिली होती.मात्र त्यावेळी केवळ सदरचे सरपंचपद हे इतर मागासप्रवर्ग यासाठी आरक्षित असल्याने केवळ तांत्रिक कारणाने वाचले होते.मात्र या सरपंच थोरात हे अल्पमतात आले होते.त्यानंतर हि दुसरी घटना घडली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या जवळके ग्रामपंचायतीचे सरपंच बाबुराव कारभारी थोरात यांचेवर एप्रिल महिन्यात सात पैकी सहा सदस्यांनी अविश्वास ठराव तहसीलदार कोपरगाव यांचेकडे दाखल केल्याने परिसरात खळबळ उडाली होती.या ग्रामपंचायतीची तीन वर्षांपूर्वी निवडणूक संपन्न झाली होती मात्र सरपंच यांनी या सदस्यांना विश्वासात घेतले नाही,अधिकाराचा दुरुपयोग,कर्तव्यात कसूर करणे,विकास कामांचा अभाव,ग्रामपंचायतीच्या ठरावाची अंमलबजावणी न करणे,पंचायतीच्या कामकाजात दिरंगाई करणे आदी कारणे यात दिली होती.मात्र त्यावेळी केवळ सदरचे सरपंचपद हे इतर मागासप्रवर्ग यासाठी आरक्षित असल्याने केवळ तांत्रिक कारणाने वाचले होते.मात्र या सरपंच थोरात हे अल्पमतात आले होते.त्यानंतर आ.आशुतोष काळे यांच्या रविवार दि.१३ जून रोजी सकाळी संपन्न होणाऱ्या भूमीपूजनावर बहिष्कार हि दुसरी घटना घडली आहे.त्यामुळे याबाबत तालुक्याच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने इतर मागासवर्ग आरक्षणच आता रद्द केल्याने आता ज्या तांत्रिक बाबीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी या सरपंचा विरुद्ध अविश्वास ठराव फेटाळला आहे त्या बाबीवर अविश्वास आणणारे सदस्य जिल्हाधिकारी यांचेकडे अपिलात जाऊ शकतात व त्यातून हे सरपंच पद काढले जाऊ शकते असे जाणकारांचे म्हणणे असून या बाबत विधि सल्लागारांशी चर्चा केली जाऊन निर्णय घेतला जाणार असल्याची माहितीही उपसरपंच मंदाबाई थोरात यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.

या प्रसिद्धी बहिष्काराच्या पत्रकावर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच मंदाबाई सुधाकर थोरात,सदस्य कविता खंडू थोरात यांचेसह प्रकाश गोरक्षनाथ थोरात,विजय साहेबराव थोरात,श्रीमती मालती अनिल थोरात आदीं पाच सदस्यांनी पाठिंबा दिला असून त्या प्रासिद्धी पत्रकावर त्यांच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close