कोपरगाव तालुका
कोरोना रुग्णवाढीमुळे कोपरगाव शहरात पुन्हा नवे नियम
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात टाळेबंदी उठवल्यानंतर नागरिकांनी पुन्हा पूर्ववत गर्दी करणे सुरु केल्याने व तालुक्यात रुग्णसंख्या वाढल्याने कोरोना प्रतिबंध करण्यासाठी सर्व व्यापारी,नागरिक व कोरोना शहर सुरक्षा समिती आदींनी केलेल्या मागणी नुसार,उद्या दि.११ जून पासून दवाखाने मेडिकल वगळता शहरातील सर्व आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू रहाणार आहेत.तसेच रविवार वगळता फक्त हॉटेल,रेस्टॉरंट,खानावळ रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
राज्यात कोरोनाचा आलेख कमी झाल्याने राज्य सरकारने स्थानिक प्रशासनाला जबाबदारी सोपवून टाळेबंदी उठवली होती.त्या नंतर नागरिकांनी शहर व तालुक्यात खरेदी साठी मोठी झुंबड उडवली होती.त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती.त्याच बरोबर रुग्णसंख्या वाढीची शक्यता कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी व्यक्त केली होती.ती आज वाढलेल्या कोरोना रुग्णामुळे खरी ठरली आहे.
राज्यात कोरोनाचा आलेख कमी झाल्याने राज्य सरकारने स्थानिक प्रशासनाला जबाबदारी सोपवून टाळेबंदी उठवली होती.त्या नंतर नागरिकांनी शहर व तालुक्यात खरेदी साठी मोठी झुंबड उडवली होती.त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती.त्याच बरोबर रुग्णसंख्या वाढीची शक्यता कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी व्यक्त केली होती.ती आज वाढलेल्या कोरोना रुग्णामुळे खरी ठरली आहे.त्यामुळे पुन्हा आगामी काळात कठोर टाळेबंदी टाळायची असेल तर आज पासूनच त्यावर निर्बंध लादावे लागणार असल्याची बाब कोपरगाव शहरातील व्यापारी व नागरिकांनी ओळखली असून हे सुचिन्ह मानावे लागेल.त्या दृष्टीने हालचाल सुरु झाली असून शहर प्रशासनाने हालचाल सुरु केली आहे.त्या निर्णयानुसार आता दर रविवारी शहरात जनता संचारबंदी राहाणार आहे.तर रविवारी अत्यावश्यक सेवा म्हणून वैद्यकीय सेवेबरोबरच दूध विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना त्यात सकाळी ७ ते १० सूट देण्यात आली आहे.
कोपरगाव शहरातील सर्व नागरिक,आस्थापना,व्यापारी सर्वांनी याची नोंद घ्यावी.नियमितपणे मुखपट्या,कोरोना साथ प्रतिबंदात्मक औषधे आणि सुरक्षित अंतर पाळणे गरजेचे आहे.या नियमांचे कोणीही उल्लंघन करू नये केल्याचे आढळल्यास त्या नागरिकांवर दंडात्मक व कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे.सदर प्रसिद्धी पत्रकावर कोपरगाव पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले आदींच्या सह्या आहेत.