कोपरगाव तालुका
कुंभारीत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात संपन्न
न्यूजसेवा
कुभांरी-(प्रतिनिधि)
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कुंभारी मध्ये रक्तदान शिबिर व वृक्षारोपण संपन्न श्री साई राघवेशवर प्रतिष्ठाण व ग्रामपंचायत सर्व ग्रामस्थ कुंभारी साईनाथ ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला आहे.
पर्यावरणाचे आपल्याभोवती असणे आपण गृहीत धरून, गेली काही दशके, त्यातील विविध घटकांची हानी करत आलो आहोत. परंतु, पर्यावरणाचा समतोल ढासळण्याचे परिणाम दैनंदिन जीवनातही जगभर दिसू लागल्याने याबाबत जागृती करण्याची गरज उत्पन्न झाली आहे.
याप्रसंगी तालुक्याचे गट गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,विस्तार अधिकारी वाघमोडे,राघवेशवर देवस्थानचे राघवेशवर नदंगिरी महाराज,लोकनियुक्त सरपंच तसेच साई राघवेशवर प्रतिष्ठाण अध्यक्ष प्रशांत घुले,उपाध्यक्ष वाल्मिक निळकंठ,प्रतिष्ठाणचे सचिव श्रीकांत पैठणे,उपसरपंच दिगंबर बढे,ग्रामसेवक कासवे, कृषी सहाय्यक निलेश बिबवे,श्री साई राघवेशवर प्रतिष्ठाणचे सर्व सदस्य संतोष कदम, डाॕक्टर विजय गोडगे,रावसाहेब थोरात,संतोष मोहरे, लदिलीप ठाणगे,जयवंत बढे, राहुल निळकंठ,सिद्धांत घुले,अतुल निळकंठ,विशवजीत घुले,राजेंद निळकंठ श्रीराम घुले व ग्रामपंचायत सदस्य ललित निळकंठ आशिष थोरात, वसंतराव घुले,माजी उपसरपंच शिवाजी घुले,सुभाष घुले,सोमनाथ निळकंठ,नाना शेजवळ,रामकृष्ण मोहरे,व आदि ग्रामस्थ हजर होते.सर्व ब्लड बँक चे डॉक्टर डाॕक्टर श्री धोका सर,सिस्टर माया,सुनिता ,अशोक सातभाई,सागर निर्मळ, अमोल,सापते.धुमसे आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला आहे.
यावेळी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी आजच्या परिस्थितीत रक्तदान खूप गरजेचे आहे जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे महत्त्व वृक्षारोपण अशा माध्यमातून ग्रामस्थ हरित कुंभारी स्वच्छ सुंदर कुंभारी यासाठी ग्रामस्थ पुढाकार घेत आहे लोकसहभाग देत आहेत यासाठी सर्वांचे कौतुक केले यावेळी श्री सचिन सूर्यवंशी यांची खरीप पिकांचे कीड रोग सर्वेक्षण पीक सल्ला प्रातिनिधिक स्वरूपात शेतकऱ्यांना देण्यात आला. लोकनियुक्त सरपंच प्रशांत घुले यांनी ग्रामस्थांना वृक्षारोपण साठी केलेल्या भरीव योगदान विषयी उपस्थितांना माहिती दिली तसेच जवळपास ३१ लोकांनी रक्तदान केले व त्यांच्या हस्ते २१ वृक्षचे वृक्ष रोपण करण्यात आले.त्यात वड,पिपंळ,चिंच,जाबुंळ,कांचन,त्यांचे श्री साई राघवेशवर प्रतिष्ठाण कुंभारी व ग्रामपंचायत कुंभारी च्या वतीने आभार व्यक्त केले प्रमाणपत्र देऊन सन्मान केला श्री साई राघवेशवर प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष वाल्मिक निळकंठ यांनी राघवेश्वर देवस्थानच्या विविध कामांविषयी माहिती दिली सर्वांचे आभार व्यक्त केले.