कोपरगाव तालुका
कृषी सेवा केंद्रांना वेळ वाढवून द्या-कोपरगावात मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात खरीप हंगाम सुरु होण्यास अवघा काही दिवसांचा वेळ राहिला असताना व पावसाने वेळेआधीच आगमन केल्याने हंगामपूर्व नियोजन करण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेता संघटनेनें तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांना वेळ वाढवून द्यावा अशी मागणी नुकतीच तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांनी समक्ष भेटून केली आहे.
“सरकारने सर्वच व्यापार उदीम गोठवून अत्यावश्यक सेवा फक्त सुरु ठेवल्या आहेत.त्यामुळे कृषी क्षेत्राचे नुकसान होण्याची साधार भीती व्यक्त होत आहे.खरीप हंगाम सूरु होत असल्याने आता सकाळी सात ते अकरा वाजेची वेळ शेतकऱ्यांना परवडणारी नाही त्या ऐवजी हि वेळ वाढवून सकाळी आठ ते सायंकाळी सात वाजे पर्यंत करावी”-राजेंद्र खिलारी,कृषी सेवा संचालक.
राज्यासह नगर जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले असून शेतीच्या मशागतीची कामे सुरू करून खते व बियाण्यांसाठी जुळवाजुळव केली जात आहे.कृषी खात्यानेही आढावा बैठक घेऊन खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. ६२ टक्के क्षेत्र कोरडवाहू असल्याने खरीप हंगामावर शेतक ऱ्यांची सारी आशा असते.यावर्षी पाऊस चांगला राहील,असा अंदाज वेधशाळानीं दिला असल्याने शेतक ऱ्यांच्या हंगामाबाबतच्या आशा वाढल्या असून त्याने उत्साहाने कामाला सुरुवात केली आहे.या पार्श्वभूमीवर हि भेट घेण्यात आली आहे.
सदर प्रसंगी राजेंद्र खिलारी,भास्कर सुरळे,विशाल ठोळे,किरण मेहेत्रे,दीपक गव्हाळे,सुमित टेके,सचिन कुटाफळे आदींनी चर्चेत सहभाग नोंदवला आहे.
कोरोना कालखंड अद्याप संपलेला नाही त्याला कोपरगाव तालुकाही त्याला अपवाद नाही.वर्तमानात कोरोना विषाणूच्या साथीने कहर केलेला असताना सरकारने सर्वच व्यापार उदीम गोठवून अत्यावश्यक सेवा फक्त सुरु ठेवल्या आहेत.त्यामुळे कृषी क्षेत्राचे नुकसान होण्याची साधार भीती व्यक्त होत आहे.खरीप हंगाम सूरु होत असल्याने आता सकाळी सात ते अकरा वाजेची वेळ शेतकऱ्यांना परवडणारी नाही त्या ऐवजी हि वेळ वाढवून सकाळी आठ ते सायंकाळी सात वाजे पर्यंत करावी अशी मागणीही या संघटनेने आ.काळे यांचेकडे शेवटी केली आहे.
त्यावेळी आ.काळे यांनी या अडचणी सोडविण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी आपण बोलून घेऊ असे आश्वासन दिले आहे.