कोपरगाव तालुका
निवडणूक प्रक्रिया अभ्यासपुर्ण समजून मतदान केंद्रावर काम करा-जिल्हाधिकारी द्विवेदी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगांव (प्रतिनिधी )
राज्याची विधानसभा निवडणुक येत्या एकवीस ऑक्टोबर रोजी संपन्न होत असून या निवडणुकीत नियुक्त केंद्रावर नेमून दिलेली जबाबदारी विशेष जबाबदारीने पार पाडावी असे आवाहन अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कोपरगाव येथे नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.राज्याच्या 288 जागांसाठी राज्यात येत्या एकवीस तारखेला विधानसभेची निवडणूक होत असून त्यात नगर जिल्ह्यातील बारा जागांचा समावेश आहे.या सर्व जागांवर निवडणूक प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडावी यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जातीने लक्ष घालून काम सुरु आहे.या पार्श्वभूमीवर त्यांनी कोपरगाव विधानसभा निवडणुकीचा पाहणी दौरा काल दुपारी चार वाजेच्या सुमारास संपन्न झाला त्या वेळी लोढा मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.सदर प्रसंगी कोपरगाव विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके, तहसिलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी योगेश चंद्रे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.कोपरगांव विधानसभा निवडणूक संदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अहमदनगर राहुल द्विवेदी यांनी प्रशिक्षण केंद्र,साहित्य वितरण केंद्र,मतमोजणी केंद्राला भेट दिली.याप्रसंगी केंद्र स्तरावर कामकाज पहाणारे कर्मचारी यांचेशी हितगुज साधून त्यांनी मतदारसंघातील सर्व केंद्रे व त्यांचे अधिकारी कर्मचारी यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. प्रशिक्षणात मार्गदर्शनात त्यांनी अधिकारी व कर्मचारी यांचेशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या व एकूण टायरीबद्ल समधनव्यक्त केले आहे.