कोपरगाव तालुका
मायगाव देवी मतदारांचा विधानसभा निवडणुकीवर टाकला बहिष्कार !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगावात आपण गत पाच वर्षात साडेतीनशे कोटी रुपयांचा विकास निधी आणून तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलून टाकला म्हणणाऱ्या विद्यमान सत्ताधाऱ्यांना मायगाव देवी मतदारांनी,”सत्तर वर्षात आपल्याला साधा रस्ता तयार करून मिळाला नाही,गावात साधी परिवहन मंडळाची बस येत नसल्याने मुलामुलींना शिक्षणापासून व आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत असल्याच्या” कारणावरून एकवीस ऑक्टोबर रोजी संपन्न होणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकून सत्ताधाऱ्यांना आरसाच दाखवून दिल्याने कोपरगाव तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
या देशाला लुटण्यास आलेल्या इंग्रजांना या भागातील शेतकऱ्यांची दया आली व त्यानी या भागातील शेतकऱ्यांचे भूकबळी थांबविण्यासाठी नाशिक जिल्ह्यात धरणे बांधली व कालवे काढले.मात्र तालुक्यातील सत्ताधाऱ्यानी मात्र इंग्रजांनी निर्माण केलेले पाणी मात्र उद्योगांना व आपल्या नाशिक जिल्ह्यातील सग्यासोयऱ्यांच्या पाणी वापर संस्थांना,महापालिकांना वाटून दिले.त्यामुळेही तालुक्यात असंतोष आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि, कोपरगाव सत्तरच्या दशकाच्या प्रारंभी भारताचा कॅलिफोर्निया असल्याचे उदगार तत्कालीन देशाचे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी कोपरगाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना काढले होते.त्या नंतर तालुक्यात सत्तेवर आल्यावर नेत्यांनी तालुक्यात काय दिवे लावले हे वारंवार स्पष्ट झाले आहे.या देशाला लुटण्यास आलेल्या इंग्रजांना या भागातील शेतकऱ्यांची दया आली व त्यानी या भागातील शेतकऱ्यांचे भूकबळी थांबविण्यासाठी नाशिक जिल्ह्यात धरणे बांधली व कालवे काढले.मात्र तालुक्यातील सत्ताधाऱ्यानी मात्र इंग्रजांनी निर्माण केलेले पाणी मात्र उद्योगांना व आपल्या नाशिक जिल्ह्यातील सग्यासोयऱ्यांच्या पाणी वापर संस्थांना,महापालिकांना वाटून दिले.तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था तर विचारायला नको.मायगाव देवी या गावात स्वातंत्र्य मिळून जवळपास एकात्तर वर्ष होत आली असताना ग्रामस्थांना गावात जाण्यासाठी रस्तेच नसल्याचा आरोप केला आहे.परिणामी ग्रामस्थांना तालुक्याला जाण्यासाठी मोठी यातायात करावी लागत आहे.मुलामुलींना शाळा महाविद्यालयांत उच्च शिक्षणासाठी जाता येत नाही.आरोग्य सुविधा गावात उपलब्ध नसल्याने तालुक्यात उपचारासाठी जाताना रस्त्यात केवळ चिखलाचे साम्राज्य असल्याने नको ती आपत्ती नागरिकांवर व महिलांवर येत आहे.व तालुक्याचा लोकप्रतीनिधी मात्र महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरण्याच्या लोकप्रिय व मते मिळवण्याच्या कोरड्या घोषणा करत असल्याने घोषणा व वास्तव यात मोठे जमीन आस्मानचे अंतर असल्याचे स्पष्ट होत आहे.
या बाबत वारंवार लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करूनही ग्रामस्थांच्या हाती केवळ शब्द फुलोरेच आले आहे.त्यामुळे या व्यवस्थेवरील आमचा विश्वास उडाल्याने आम्ही अखेर एकत्र येऊन ग्रामस्थांनी येत्या 21 ऑक्टोबर रोजी संपन्न होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
जनावरांना चारा आणणे आदी बाबी रस्त्याअभावी कठीण कर्म बनले आहे.मायगाव देवी ते धामोरी-टाकळी (झेड कॉर्नर),मायगाव देवी ते सांगवी भुसार,मायगाव देवी ते धामोरी,मायदेवी ते मोर्वीस,मायगाव देवी ते वेळापूर या रस्त्यांवर डांबरीकरण फार दूरची गोष्ट असून त्या मार्गावर अद्याप खडीकरणही झालेले नाही.वर्तमानात होणाऱ्या पावसाने तर चिखलाने कहर केला आहे.या बाबत वारंवार लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करूनही ग्रामस्थांच्या हाती केवळ शब्द फुलोरेच आले आहे.त्यामुळे या व्यवस्थेवरील आमचा विश्वास उडाल्याने आम्ही अखेर एकत्र येऊन ग्रामस्थांनी येत्या 21 ऑक्टोबर रोजी संपन्न होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.असेही ग्रामस्थांनी कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे याना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर काकासाहेब खर्डे,अशोक कदम,संदीप जगताप,अण्णासाहेब गाडे,साहेबराव नाजगड,संजय साबळे, दिलीप कासार,दिनकर साबळे, राजेंद्र नाजगड,मच्छीन्द्र गाडे,भाऊसाहेब भवर, माधव नाजगड, शैलेश भुसारे,अशोक गाडे,दौलतराव गाडे,आदीं प्रमुख मान्यवरांसह पासष्ट ग्रामस्थांनी सह्या केल्याने सत्ताधारी गटाला ऐन निवडणुकीत घाम फुटला आहे.व ग्रामस्थांनी त्यांचा खरी “काम काम बोलता है” ही वचनपूर्ती बाहेर काढली असल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे.