कोपरगाव तालुका
नितीन बोरावके यांना मातृशोक,अंत्यविधी आज पुण्यात
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव -(प्रतिनिधी )
कोपरगाव शहरातील उद्योजक व टाकळी येथील रहिवाशी ,संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रभाकर उर्फ पी.टी. बोरावके यांच्या धर्मपत्नी कमलताई (शैलाताई ) बोरावके (वय-84) यांचे नुकतेच पुणे येथे वृद्धपकाळाने निधन झाले आहे.त्या टाकळी येथील प्रगतशील शेतकरी नितीन बोरावके यांच्या मातोश्री होत्या. त्याच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्यावर पुणे येथे स्मशानभूमीत आज दुपारी एक वाजता अंत्यविधी करण्यात येणार आहे.त्यांनी साई संस्थानचे माजी विश्वस्त प्रभाकर बोरावके हे सामाजिक कार्यात असताना त्यांनी शेतीचा सगळा भार आपल्या खांद्यावर वाहिला होता.पुण्यातील पिंगळे कुटुंब हे त्यांचे माहेर होते. त्यांच्या पच्छात उद्योजक अनिल बोरावके,आदी मुले नातवंडे, आदी परिवार आहे.बोरावके कुटुंब उच्चशिक्षित करण्यात त्यांनी मोठी भूमिका निभावली होती.त्यांच्या निधनाने कोपरगाव,राहाता तसेच पुणे परिसरात शोककळा पसरली आहे.