कोपरगाव तालुका
कोपरगावात कोरोना उपचार केंद्रात नमाज केली अदा
न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगावात वाढत असलेल्या कोरोना रुग्णवाढीचा ताण दिवसेंदिवस वाढत असून त्यावर उपाय योजना होत असताना कोरोना उपचार केंद्रात सार्वत्रिक सणासाठी नमाज अदा करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी बाधित मुस्लीम बांधवांची चिंता दूर करून कोविड उपचार केंद्रातच पवित्र नमाज अदा करण्यासाठी योग्य सुविधा निर्माण करून दिल्यामुळे बाधित मुस्लीम बांधवांनीं समाधान व्यक्त केले आहे.
कोरोना विषाणूने संपूर्ण भारतभर कहर उडवून दिला आहे.राज्यातही मोठ्या प्रमाणात रुग्णवा वाढ सुरु आहे.त्यामुळे आरोग्य विभाग चिंतेत आहे.त्यासाठी टाळेबंदी जाहीर करण्यात आली असून तिसरी टाळेबंदी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच धार्मिक सण उत्सव साजरे करतांना बंधने घालण्यात आली आहेत.शुक्रवार (दि.१४) रोजी अक्षयतृतीया व रमजान ईद हा सुवर्णयोग जुळून आला.मुस्लीम बांधवानी मस्जिदमध्ये न जाता घरीच पवित्र नमाज अदा केली तर अक्षयतृतीये निमित्त घराघरात सुग्रास मेनू होता.आ.आशुतोष काळे यांच्या सूचनेवरून कर्मवीर शंकरराव काळे कोविड केअर सेंटरमधील बाधित रुग्णांना देखील हा मेनू देण्यात आला आहे. व मुस्लीम बांधवांना नमाज अदा करण्यासाठी सुविधा देखील निर्माण करून दिली. मुस्लीम बांधवांनी पवित्र नमाज अदा करून विश्वावर आलेले कोरोनाचे संकट दूर व्हावे यासाठी दुवा केली आहे.