कोपरगाव तालुका
कोपरगावात प्राणवायूचा प्रकल्प तूर्त गुंडाळला !
न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण वाढत असून त्याचा मुकाबला करण्यासाठी रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा होणे गरजेचे आहे,मात्र तातडीने हा प्रकल्प उभारणे शक्य नसल्याने व याबाबत तालुक्याचे आ.आशुतोष काळे यांनी सकारात्मक निर्णय घेतल्याने दुसरा प्रकल्प उभारण्याचा कोणताही उद्देश नसल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
“देशभरात मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन प्रकल्पाची मागणी वाढल्याने अजून किमान चार महिने तरी ऑक्सिजन प्रकल्प उभारून देता येणार नाही” असे स्पष्टीकरण मिळाले आहे.आ.आशुतोष काळे यांनीही एका नविन ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचे आदेश जारी केले आहे तो उभारल्यानंतर येणाऱ्या काळात तालुक्यातील रुग्णांची ऑक्सिजनची सोय होणार आहे.त्यामुळे सध्या तरी लोकसहभागातून ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा विषय थांबविला आहे”-विजय वहाडणे,नगराध्यक्ष कोपरगाव.
देशात दिवसागणिक कोरोनाबाधितांचीच संख्या केवळ वाढत नाही तर आता मृतांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. भारतात पहिल्यांदाच एका दिवशी चार हजारांपेक्षा जास्त मृत्यूंची नोंद झाली आहे. तर सलग तिसऱ्या दिवशी चार लाखांपेक्षा जास्त नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप सुरुच आहे.आजही कोरोना रुग्णांचा आकडा ५० हजारांच्या वरच आला आहे.आज राज्यात ५४ हजार ०२२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर ३७ हजार ३८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.राज्याचा रिकव्हरी रेट ८५.३६ टक्क्यांवर पोहोचला आहे.काल राज्यात ६२ हजार ६२ हजार १९४ कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली होती तर ६३ हजार ८४२ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले होते.मात्र अनेक रुग्णालयात कोरोना रुग्णांना प्राणवायूच भेटत नाही.त्यामुळे अनेक रुग्ण हातपाय खोडून मरत आहे.याबाबत कोपरगाव शहरही अपवाद नाही त्यामुळे याबाबत तातडीने निर्णय घेण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकतीच पालिकेत शहरातील मान्यवरांची बैठक आयोजित केली होती त्यावेळी विचार-विनिमय करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
सदर प्रसंगी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,उद्योजक अरविंद भन्साळी,राजेश ठोळे,आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी,”कोपरगाव शहरात लोकसहभागातून एक ऑक्सिजनचा झालेला प्रचंड तुटवडा कमी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे”असे मत सर्वांनी यावेळी मांडले होते.या वेळी ऑक्सिजनअभावी होत असलेले मृत्यु रोखणे महत्वाचे असल्याचे म्हटले आहे.५० ते ६० लाख रूपये गुंतवणूक करून ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी आर्थिक भार उचलण्याचे अनेकांनी मान्यही केले.पण त्यानंतर अरविंद भन्साळी,राजेश ठोळे,ओमप्रकाश कोयटे यांनी अनेक राज्यातील “ऑक्सिजन प्रकल्प” निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क केला असता त्यांच्याकडून,”देशभरात मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन प्रकल्पाची मागणी वाढल्याने अजून किमान चार महिने तरी ऑक्सिजन प्रकल्प उभारून देता येणार नाही” असे स्पष्टीकरण मिळाले आहे.आ.आशुतोष काळे यांनीही एका नविन ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचे आदेश जारी केले आहे तो उभारल्यानंतर येणाऱ्या काळात तालुक्यातील रुग्णांची ऑक्सिजनची सोय होणार आहे.त्यामुळे सध्या तरी लोकसहभागातून ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा विषय थांबविला असल्याचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी म्हटले आहे.