जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यातील महसुली अधिकाऱ्यास ‘वाळूचोर’ आणि ‘महसुली कर्मचाऱ्यांनी’ लावली ‘शेंडी’

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यात या पूर्वी लोकप्रतिनिधी सहभागी असल्याचे निष्पन्न झाले असताना आता वाळूचोरीत महसूल विभागाचे कर्मचारी सहभागी असल्याची धक्कादायक बाब धामोरी परिसरात निष्पन्न झाली असून या प्रकरणात वाळूचोर आणि वाळू उपसा प्रतिबंधक पथक यांनी तालुक्याच्या जबाबदार महसुली अधिकाऱ्यास ‘शेंडी’ लावल्याने या बाबत तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.याबाबत आता महसूल अधिकारी काय भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

‘ज्या’ राजकीय नेत्यांनी तालुक्याच्या उज्वल कृषी भवितव्यासाठी वाळूचोरीवर उत्तर शोधणे गरजेचे असताना वर्तमानात त्यांचे व त्यांच्या युवराजांचेच हात बरबटले असल्याने समस्या गंभीर बनली आहे.श्रीरामपूर तालुक्यातील लिलावात येथील माजी राजकीय नेत्यांच्या सुपुत्रांचा हात असल्याची विश्वसनीय माहिती असून कोपरगाव तालुक्यातही दोन प्रमुख आजी-माजी लोकप्रतिनिधी व प्रत्येक पक्षाचा प्रमुख यात या वर्षी सामील झाला आहे.आता महसूल विभागाचे कनिष्ठ कर्मचारीही सामील झाले आहे.यावरून या प्रकरणाचे गांभीर्य कोणाही सुज्ञ वाचकांच्या ध्यानी येईल.

कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीतून वाळूचोरी हा मोठा गंभीर प्रश्न बनला आहे.यातून खून पडु लागले आहेत.तर काही राजकीय पुढारी यास प्रतिबंध करण्या ऐवजी आपल्या तुंबड्या भरून घेत आहेत.परिणामी हा प्रश्न अजून गंभीर बनला आहे.भोजडे,येथे गतवर्षी या बाबीवरून एकाचा खून झाल्याची घटना ताजी आहे.या पूर्वीही तेरा वर्षांपूर्वी तर कोकमठाण येथे व संवत्सर येथे २०१२ साली यावैध वाळूतून मुडदे पडले आहे.व गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत.हि अत्यंत गंभीर बाब असून यातून वाळूचोरांकडे मोठ्या प्रमाणात गावठी कट्टे आढळून येत आहेत.त्यातून या घटना वाढीस लागल्या आहेत.या कडे सामाजिक व पर्यावरणीय प्रश्न म्हणून पाहणे गरजेचे आहे.यातून गोदावरी खोऱ्यात भूजल पातळी खूप खोलवर गेल्याने शेती क्षेत्राचे ‘न भूतो’ अशी हानीं झाली आहे.महसूल अधिकारी तीन वर्षात बदली होत असल्याने जाता-जाता हात धुवून घेत असल्याचे अनेकांच्या लक्षात आले आहे.मात्र यावर ज्या राजकीय नेत्यांनी तालुक्याच्या उज्वल कृषी भवितव्यासाठी उत्तर शोधणे गरजेचे असताना वर्तमानात त्यांचे व त्यांच्या युवराजांचेच हात बरबटले असल्याने समस्या गंभीर बनली आहे.श्रीरामपूर तालुक्यातील लिलावात येथील माजी राजकीय नेत्यांच्या सुपुत्रांचा हात असल्याची विश्वसनीय माहिती असून कोपरगाव तालुक्यातही दोन प्रमुख आजी-माजी लोकप्रतिनिधी व प्रत्येक पक्षाचा प्रमुख यात या वर्षी सामील झाला आहे.यावरून या प्रकरणाचे गांभीर्य कोणाही सुज्ञ वाचकांच्या ध्यानी येईल.विशेषतः कोपरगाव तालुक्यात या क्षेत्रात थोरल्या-धाकट्या पातीच्या युवराजांची आघाडी व प्रगती ‘वाखाणण्यासारखी’ असताना आता महसूल विभागही यात कमी नसल्याचे दिसून आले आहे.त्याचे ताजे उदाहरण म्हणून धामोरी परिसरातील दोन स्थानिक महसुली कर्मचाऱ्यांच्या आवाजाच्या काही ध्वनी मुद्रिकांचा प्रसार सध्या सामाजिक संकेत स्थळावर चर्चेच्या अग्रस्थानी आहे.यात शुक्ला नावाचा एक निम्न स्तरीय महसुली कर्मचारी दुसऱ्या समकक्ष कर्मचाऱ्याशी संपर्क साधताना त्याने ‘रवी’ नामक वाळूचोरांचा ट्रॅक्टर पकडल्याबाबत आक्षेप घेताना दिसत असून ‘तो’ आपण ‘सचिन’चा मित्र असल्यानेच आपला ट्रॅक्टर वारंवार चौथ्यांदा पकडला असल्याचा दावा करून एका महसुली कर्मचाऱ्याला धमकावताना दिसत आहे.व ‘शुक्ला’नामक तलाठी त्या ट्रॅक्टरला सोडण्यास तयार नसल्याचे आधी सांगतो मात्र वाळूचोर त्याला धमकावतो तो पुन्हा ‘शुक्ला’ नावाच्या महसुली कर्मचाऱ्याशी संपर्क साधतो व “तुम्हीच कशाला वाळूचोरांना अंगावर घेता” असा सवाल करून सोडविण्यास सांगतो. त्या प्रमाणे ते दोन्ही महसुली कर्मचारी त्यास तयार होताना दिसतात मात्र ट्रॅक्टर घेऊन जाण्यासाठी जो ‘विकास’ नावाचा चालक आणलेला असतो तालुक्याच्या प्रमुख महसुली अधिकाऱ्यांचा विश्वासातील असल्याचे दिसते.तो प्रथम नकार देतो मात्र त्याला हे दोन्ही कनिष्ठ महसुली कर्मचारी दबाव असून सोडण्यास भाग पाडतात असे दिसते आहे.त्यावर त्या चालकावर दबाव आणल्यावर त्याला,”ट्रॅक्टर नांगरटीतून पळवून नेला” असे महसुली अधिकाऱ्यास सांगण्यास सांगुण तालुक्याच्या महसुली अधिकाऱ्यास कशी ‘शेंडी’लावायची याचा धडा देताना दिसत आहे.’तो’चालक आपण महसुली अधिकाऱ्यांच्या तोफेच्या तोंडी जाण्यास तयार नसतो मात्र यांनी दबाव वाढविल्यावर व ‘तो’त्या वाळूचोरीचा लाल रंगाचा ‘स्वराज’ ट्रॅक्टर सोडून देतात असे एकंदरीत या ध्वनिफितीत चित्रित होत आहे.त्यामुळे तालुक्यात महसुली विभागाच्या अधिकाऱ्यांचा धाक या ध्वनिफितीत दिसत असला तरी या अधिकाऱ्याला मात्र या कनिष्ठ महसुली कर्मचाऱ्यांनी हुबेहूब “चुना” लावल्याचे दिसत आहे.त्यामुळे या जबाबदार अधिकाऱ्याची सद्दी वाळूचोर आणि कनिष्ठ महसुली कर्मचाऱ्यांनी संपवुन त्यांना शेंडी लावली की काय ? असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close