जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना मोफत धान्य देणार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

मागील मार्च महिन्यापासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीपोटी हातावर पोट असणारे कष्टकरी नागरिक घराबाहेर पडत नव्हते.त्यामुळे या नागरिकांची उपासमार होवू नये यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री ना.अजित पवार तसेच अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी रेशनकार्डवर मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार रेशनकार्ड धारकांना मे व जून महिन्याचे प्रती माणशी ५ किलो धान्य रेशनवर मोफत देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

प्रसिद्धी पत्रकात पुढे त्यांनी असे म्हटले आहे की,रेशनवर मोफत किंवा अल्पदरात अन्नधान्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला ५ एप्रिल रोजी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ यांच्याकडे केली होती.राज्यात निर्माण झालेल्या कोरोना परिस्थितीचा विचार करून राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री तसेच अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री यांनी रेशनकार्डवर मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार रेशनकार्ड धारकांना मे व जून महिन्याचे प्रती माणशी ५ किलो धान्य रेशनवर मोफत देण्यात येणार आहे. यामध्ये रेशन कार्डवर प्रती माणशी ३ किलो गहू व २ किलो तांदूळ असे एकूण माणशी प्रती ५ किलो धान्य या दोन महिन्यात मोफत दिले जाणार असून मे महिन्याचे धान्य वाटप हे सोमवार (दि.२६) पासून सुरु होणार असल्याची माहिती आ. काळे यांनी दिली आहे.

अशा जीवघेण्या परिस्थितीत सर्वसामान्य नागरीकांच्या जीवनात अडचणी निर्माण होऊ नये.त्यांचा रोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटून हातावर पोट असलेल्या कुटुंबाना वेळेत अन्न धान्य मिळावे यासाठी महाविकास आघाडी सरकारने वेळीच दखल घेवून रेशन कार्ड धारकांना मे व जून या दोन महिन्यांसाठी रेशन कार्डवर मोफत धान्य देण्याचा घेतलेला निर्णय दिलासा देणारा आहे. त्याबद्दल कोपरगाव विधानसभा मतदार संघातील जनतेच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री यांचे आभार मानतो.सोमवार पासून मे महिन्याचे धान्य रेशन दुकानातून वाटप करण्यात येणार आहे.प्रशासनाने योग्य नियोजन करून एकही लाभार्थी मोफत धान्यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी.तसेच सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमणावर आढळून येत आहे.त्यामुळे मोफत धान्य घेण्यासाठी जातांना सर्व रेशनकार्ड धारकांनी योग्य ती काळजी घ्यावी व गर्दी न करता शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close