कोपरगाव तालुका
कोपरगावात दोन घराण्याला पन्नास वर्ष सत्ता तरी विकास नाही-वहाडणे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील काळे आणि कोल्हे या दोन घराण्यांना येथील मतदारांनी पन्नास वर्ष सत्ता दिली असताना त्यांनी तालुक्याचा विकास का केला नाही व या पन्नास वर्षात त्यांनी नेमका कोणाचा विकास केला हे प्रथम जाहीर करावे अशी रास्त मागणी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी आज दुपारी ऐका कार्यक्रमात बोलताना केली आहे.
कोपरगाव तालुका नरेंद्र मोदी मंचच्या वतीने कोपरगाव शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा कोपरगाव शहरात बाजारतळ येथील आनंद भुवन येथे आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जेष्ठ नेते रामदास खैरे हे होते.
सदर प्रसंगी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष नामदेवराव जाधव,प्रा. सुभाष शिंदे,वाल्मीकराव भोकरे,ह.भ.प.उत्तमराव महाराज बडदे,बाजार समितीचे संचालक सुधाकर गाढवे,राजेंद्र खिलारी,आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले कि,वर्तमान स्थितीत या नेत्यांनी तालुक्याची रया घालवली आहे.यांनी खाजगी कारखानदारी व कारखानदार आम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मालक बनवणार अशी भलथाप मारून घालवली व शेतकऱ्यांना झोपेत ठेवले शेतकऱ्यांना मालक बनविणे राहिले बाजूला पण पण पन्नास वर्षात मात्र गुलाम बनवले आहे.या प्रदीर्घ काळात यांच्या कडे शेतीसाठी साधे बैल नव्हते आज प्रत्येकाला किमती गाडी आली आहे.परराज्यात राजधानीच्या शहरात शेकडो एकर जमीन घेऊन ठेवल्या आहेत.पंधरा उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प असूनही कारखानंदारी तोट्यात जातेच कशी ? हा गंभीर प्रश्न आहे.याना मुळात तालुक्यातील शेतकऱ्यांचा विकास होऊ द्यायचा नाही फक्त त्या नावाखाली स्वतःचा विकास साधायचा आहे.तालुक्यातील शेती सिंचनाविना उध्वस्त करून टाकली आहे.आज तरुणांच्या रिकाम्या हातांना काम नाही त्या साठी औद्योगिक वसाहत हि मंडळी होऊ देत नाही.
कोपरगावतील प्रस्थापितांनी खाजगी कारखानदारी व कारखानदार यांना हटविण्यासाठी आम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मालक बनवणार अशी भलथाप मारली व शेतकऱ्यांना झोपेत ठेवले शेतकऱ्यांना मालक बनविणे राहिले बाजूला पण पण पन्नास वर्षात मात्र गुलाम बनवले आहे.या प्रदीर्घ काळात यांच्या कडे शेतीसाठी साधे बैल नव्हते आज प्रत्येकाला किमती गाडी आली आहे.परराज्यात राजधानीच्या शहरात शेकडो एकर जमीन घेऊन ठेवल्या आहेत.पंधरा उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प असूनही कारखानंदारी तोट्यात जातेच कशी ? हा गंभीर प्रश्न आहे.याना मुळात तालुक्यातील शेतकऱ्यांचा विकास होऊ द्यायचा नाही फक्त त्या नावाखाली स्वतःचा विकास साधायचा आहे.-विजय वहाडणे
आम्ही त्यासाठी सह्यांची मोहीम राबविल्यावर यांना जाग आली व त्यानंतर यांनी नौटंकी सुरु केली मात्र वास्तविक पाच वर्षात याना औद्योगिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेची इमारत पूर्ण करता आली नाही.तालुक्यातील एक रस्ता धड नाही.कोपरगाव शहराला पाणी देण्यासाठी पाच क्रमांकांचा तलावाचे काम करता आले नाही.तो जाणीवपूर्वक अर्धवट ठेवला आहे.आम्ही गायत्री कंपनी कडून करतो तर अडथळे निर्माण केले जात आहे.यांच्या या अधोगतीच्या लीला सर्वच जनतेला माहित आहे त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला तालुक्याचा विकास करण्यासाठी निष्ठावान म्हणून आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांनी करून आपला कोपरंगाव विधानसभेवर आपला हक्क सांगितला आहे.त्याचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मोदी मंचचे अध्यक्ष सुभाष दवंगे यांनी केले तर उपस्थितांना नामदेवराव जाधव,वाल्मिक राव भोकरे,प्रा.सुभाष शिंदे,उत्तमराव बडदे आदींनी मार्गदर्शन केले.उपस्थितांचे आभार मोदी मंचचे शहराध्यक्ष विनायक गायकवाड यांनी मानले.