कोपरगाव तालुका
महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेच्या अध्यक्षपदी..या मंत्र्यांची निवड

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नुकतीच पुणे येथे महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न झाली असून या सभेत महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांची एकमताने राज्य संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
“महाराष्ट्र तलवारबाजी खेळाडूच्या विकासासाठी विविध विभागातील जिल्ह्यांमध्ये तलवारबाजी खेळायचे अत्याधुनिक स्टेडियम व क्रीडा साहित्य उपलब्ध करुन दिले जाईल व महाराष्ट्रात सातत्याने राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन होत आहे परंतु येत्या काळात आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेण्यासाठी पुढाकार घेतला जाईल”-सतेज पाटील नूतन अध्यक्ष,राज्य तलवार बाजी संघटना.
या सभेत महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यातील एकूण ५० प्रतिनिधी उपस्थित होते भारतीय तलवारबाजी महासंघाच्या उपाध्यक्ष श्रीमती अनघा वरळीकर या भारतीय तलवारबाजी महासंघाच्यावतीने निरीक्षक म्हणून उपस्थित होत्या. या प्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष सतेज पाटील व भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सचिव व भारतीय तलवारबाजी महासंघाचे अध्यक्ष राजीव मेहता यांच्या हस्ते महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले आहे.
सदर प्रसंगी भारतीय तलवारबाजी महासंघाचे कोषाध्यक्ष अशोक दुधारे महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे सचिव बाळासाहेब लांडगे महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे पदाधिकारी प्रकाश तुळपुळे,डॉ.चंद्रजीत जाधव महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रकाश काटूळे सचिव डॉ.उदय डोंगरे,उपाध्यक्ष शेषनारायण लोंढे,दिलीप घोडके आदीं प्रमुख मान्यवरांसह ३० जिल्ह्यांचे ५० प्रतिनिधी उपस्थित होते.सदर सभा ही सुरक्षित अंतराचे नियम पाळून घेण्यात आली आहे.
राजीव मेहता यांनी महाराष्ट्र तलवारबाजी खेळाचा महाराष्ट्रातल्या तळागाळापर्यंत केलेल्या प्रचार व प्रसाराचे कौतुक करीत राज्य तलवारबाजी संघटनेस सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
तसेच राजीव मेहता व ना.सतेज पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेच्या संकेत स्थळाचे उदघाटन झाले या संकेतस्थळावर संघटनेच्या कार्याचा संपूर्ण लेखाजोखा व संघटनेच्या खेळाडूच्या प्रगतीचा व पुरस्काराचा विस्तृतपणे माहिती असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रात तलवारबाजी खेळ संपूर्ण जिल्ह्यात पोहोचला असल्याचे पाहून व अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत आहे व अनेक खेळाडू प्रशिक्षक संघटक यांना शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केल्याचे पाहून राज्य व जिल्हा तलवारबाजी संघटनेचे कौतुक केले आहे.
ना. पाटील यांची राज्य तलवारबाजी संघटनेचे अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल राज्य तलवारबाजी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रकाश काटूळे,मुख्य सल्लागार अशोक दुधारे,राज्य संघटनेचे सचिव डॉ.उदय डोंगरे,कोषाध्यक्ष प्रा.राजकुमार सोमवंशी तसेच अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेते दिलीप घोडके,सचिव प्रा.संदेश भागवत,सुनिल गोडळकर,निलेश बडजाते,बाबासाहेब गवारे,असिफ शेख,अविनाश निकम,संदीप गवारे,दीपक कसाब, निवृत्ती मुरडणर,प्रा.शिवराज पाळणे,प्रा.आकाश लकारे,प्रा.मिलिंद कांबळे,शिवप्रसाद घोडके,केदार कानडे,शिवा साठे नगर जिल्ह्यातील सर्व खेळाडू आदींनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.