कोपरगाव तालुका
कोपरगावसह राज्यात आता टाळेबंदी झाली सुरु !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ०५ हजार ०१२ इतकी आहे.तर सक्रिय रुग्णांची संख्या ६५० असून आज पर्यंत ६१ जणांचे कोरोनाने निधन झाले आहे.त्यांचा मृत्यूचा दर हा १.२५ टक्के आहे.तर एकूण २४ हजार ७७२ जणांचे श्राव तपासणी करण्यात आली आहे.त्यांचा दर दहा लाखांचा दर हा ९९ हजार ०८८असा राहिला आहे.त्या तपासणीचा बाधित दर हा १९.६८ टक्के आहे.तर उपचारानंतर बरे होणारी संख्या हि ०४ हजार २२९ इतकी आहे. तर त्यांचा बरे होण्याचा दर ८६.७५ टक्के इतका असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.
कोपरगाव तालुक्यात चार दिवसात १० जण दगावले आहे.
कोपरगाव शहर व तालुक्यात आज आलेल्या एकूण-१३७ बाधित रुग्णांत पुढील प्रमाणे कोपरगाव शहर पुरुष वय-६२,६८,२३,२१,३७,३२,२६,३३,३२,४३,२६,२७,२०,६०,४०,१३,महिला वय-४५,६०,३६,१४,३५,१७,२३,१६,बाजार तळ पुरुष वय-३०,महिला वय-५२,श्रद्धानगरी पुरुष वय-२२,ओमनगर पुरुष वय-८५,महिला वय-४२,येवला रोड पुरुष वय-४६,५०,५८,गांधीनगर पुरुष वय-३३,इंदिरा पथ पुरुष वय-४९,२५,०५,६४,२५,गजानननगर महिला वय-१५,जोशीनगर पुरुष वय-४९,समतानगर पुरुष वय-४०,१७,६५,३१,महिला वय-२५,भगवती कॉलनी पुरुष वय-४३,साईलक्ष्मी नगर पुरुष वय-६०,कर्मवीर नगर पुरुष वय-७४,३१,महिला वय-६३,२५,टिळकनगर पुरुष वय-३७,साईसिटी पुरुष वय-१६,मोहिनीराज नगर पुरुष वय-१९,निवारा पुरुष वय-१९,६५,गोकुळनगरी पुरुष वय-५५,२६,महिला वय-५१,दत्तनगर पुरुष वय-६७,मांढरे बिल्डिंग पुरुष वय-७४,महादेवनगर पुरुष वय-३४,विवेकानंद पथ महिला वय-५१,गुरुद्वारा रोड महिला वय-३८,यशवंत चौक महिला वय-३५,सप्तश्री मळा पुरुष वय-२०,धारणगाव रोड पुरुष वय-१३,६३,पांडे गल्ली पुरुष वय-४९,रचना पार्क पुरुष वय-४१,१०,महिला वय-१०,लक्ष्मीनगर पुरुष वय-३९,आदींचा समावेश आहे.
कोपरगाव तालुक्यातील एकूण ६२ रुग्ण वाढ पुढील प्रमाणे सुरेगाव पुरुष वय-२२, महिला वय-२९,रवंदे पुरुष वय-५२,४८,महिला वय-२०,२८,कोकमठाण पुरुष वय-६७,महिला वय-३०,कोळपेवाडी पुरुष वय-४८,५२,महिला वय-४५,३३,५०,कुंभारी पुरुष वय-५६,३४,२१,महिला वय-५४,संवत्सर पुरुष वय-४०,१६,५३,४८,महिला वय-३६,१३,२३,जेऊर कुंभारी पुरुष वय-२२,३०,३७,संजीवनी कारखाना पुरुष वय-३३,टाकळी पुरुष वय-५५,१४,दहेगाव पुरुष वय-३६,३२,५०,३०,३५,महिला वय-२३,३५,६०,२५,१७,६२,१६,जेऊर पाटोदा पूरुष वय-३७,महिला वय-४८,४२,माहेगाव पुरुष वय-५३,वेळापूर पुरुष वय-२८,दत्तवाडी पुरुष वय-४९,खिर्डी गणेश पुरुष वय-६३,३४,साखरवाडी पुरुष वय-४१,करंजी पुरुष वय-४२,महिला वय-४४,बहादराबाद पुरुष वय-५६,झगडे फाटा पुरुष वय-३४,चांदेकसारे पुरुष वय-५३,येसगाव पुरुष वय-५०,मंजूर पुरुष वय-२३,ब्राम्हणगाव पुरुष वय-७७,धामोरी पुरुष वय-३०,रेल्वेस्टेशन पुरुष वय-४९,मढी पुरुष वय-५६,सोनेवाडी पुरुष वय-८०,आदींचा समावेश आहे.
आजपर्यंत कोरोना नीचांकी पातळीवर होता,मात्र आता तो उच्चांकी पातळीवर पोहचला असून समूह लागण होण्याची शास्त्रज्ञांनी भीती व्यक्त केली आहे.त्यामुळे या पुढील काळात सरकारने जाहीर केल्याप्रमाणे नागरिकांना लग्न,दहावे,अंत्यविधी आदी ठिकाणी गर्दीत जाण्याचे टाळावे लागणार आहे.आज अत्यावश्यक सेवा वगळता अन्य संस्थाने बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्याने आता पुन्हा एकदा नागरिकांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे.त्यामुळे श्रमिक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तर अन्य व्यावसायिकांना आपला रोजगार गमवावा लागणार आहे.