कोपरगाव तालुका
डॉ.पानगव्हाणे यांचे एम.एस.परीक्षेत यश
जनशक्ती न्यूजसेवा
माहेगाव देशमुख-(वार्ताहर)
आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे वतीने घेण्यात आलेल्या एम.एस अंतिम वर्षाच्या परिक्षेत कोळपेवाडी येथील डॉ.दिनेश विनायकराव पानगव्हाणे यांनी उत्तीर्ण होऊन पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.त्यांच्या या यशाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोळपेवाडी येथील श्री साईसेवा हॉस्पिटलचे संचालक आहेत आश्विन सरळ आयुर्वेद कॉलेज यांची हीळ येथील महाविद्यालयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.कोळपेवाडी परिसरात डॉ.दिनेश पानगव्हाणे हे एम.एस.पदवी मिळवणारे पहिले डॉक्टर आहे.डॉक्टर पानगव्हाणे यांना डॉ.संजीव लोखंडे व डॉ. एस.जी.खंडीझोड यांचे मार्गदर्शन लाभले होते.