जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात आता रुग्णवाढीमुळे दहावी-बारावी वगळता शाळा बंद !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.राज्यात व देशात हजारोहून जास्त कोरोनाच्या रुग्णांची भर पडली आहे.त्याला कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही.कोपरंगाव तालुक्यातुन नगरला तपासणी साठी ३७ श्राव पाठवले असून तेथून तपासून आलेल्या अहवालात २४ बाधित रुग्ण आहे तर खाजगी प्रयोग शाळेतून तपासणी केलेल्या अहवालात २४ तर एकूण रॅपिड टेस्ट ७८ रॅपिड टेस्ट करण्यात येऊन त्या मधून ३२ असे एकूण ८० रुग्ण बाधित रुग्ण आढळल्याने आकडा खाली आला असला तरी कोरोनाचा वाढणारा विक्रम थांबत नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.आज आलेल्या अहवालात १४० रुग्णांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे.असल्याने कोपरगाव शहर पुन्हा एकदा उचांकी रुग्णवाढ होत आहे.प्रशासनाला रुग्ण वाढीला आळा घालण्यात अपयश येत असून शहर व तालुका टाळेबंदीकडे वेगाने वाटचाल करीत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या आदेशाने दहावी-बारावी वगळता शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ०४ हजार ४३० इतकी आहे.तर सक्रिय रुग्णांची संख्या ५२८ असून आज पर्यंत ५२ जणांचे कोरोनाने निधन झाले आहे.त्यांचा मृत्यूचा दर हा १.१७ टक्के आहे.तर एकूण २४ हजार २९० जणांचे श्राव तपासणी करण्यात आली आहे.त्यांचा दर दहा लाखांचा दर हा ९७ हजार १६० असा राहिला आहे.त्या तपासणीचा बाधित दर हा १८.२४ टक्के आहे.तर उपचारानंतर बरे होणारी संख्या हि ०३ हजार ९०६ इतकी आहे. तर त्यांचा बरे होण्याचा दर ८८.१७ टक्के इतका असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.आज आलेल्या आकडेवारीने काहीसा दिलासा मिळाला आहे.

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ९० हजार ०६७ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०६ हजार ८७५ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ८२ हजार ००० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार १९१ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात आज आलेल्या एकूण-८० बाधित रुग्णांत पुढील रुग्णांचा समावेश आहे.

कोपरगाव शहरातील रुग्ण पुढीलप्रमाणे कोपरगाव पुरुष वय-३०,३५,४०,३६,४४,४५,२४,६३,५८,महिला वय-४२,३६,६५,२६,४२,अंबिकानगर पुरुष वय-३५,धारणगाव रोड पुरुष वय-३५,सुभद्रा नगर पुरुष-४०,२८,महिला वय-२९,३५,शारदा नगर महिला वय-३७,१८,जनार्दन स्वामी आश्रम पुरुष वय-४७,इंदिरा पथ पुरुष वय-७०,५५,महिला वय-७०,२३,येवला रोड पुरुष वय-३२,अन्नपूर्णानगर पुरुष वय-४१, महिला वय-३५,खडकी पुरुष वय-२४,२७,५३,विवेकानंदनगर पुरुष वय-४०,सप्तर्षी मला पुरुष वय-६३,जुना टाकळी रोड महिला वय-३६,राम मंदिर रोड पुरुष वय-५०,शिवाजी रोड महिला वय-४५,१६,गोरोबा नगर पुरुष वय-५० आदींचा समावेश आहे.

कोपरगाव तालुक्यातील बाधित रुग्ण पुढील प्रमाणे-जेऊर पाटोदा पुरुष वय-६४,३३,६०,महिला वय-५५,५४,माहेगाव देशमुख महिला वय-२४,संजीवनी पुरुष वय-१३,१९,महिला वय-१७,२३,७९,४२,संवत्सर महिला वय-१८,धारणगाव पुरुष वय-५६, महिला वय-४६,२३,पोहेगाव पुरुष वय-४०,३६,३५,निमगाव (तालुका उल्लेख नाही) पुरुष वय-२५,धामोरी पुरुष वय-५२,कोळपेवाडी पुरुष वय-६५,३०,५५,मुर्शतपुर पुरुष वय-४०,करंजी पुरुष वय-७०,२६,ब्राम्हणगाव पुरुष वय-१९,५७,सडे महिला वय-२२,वारी महिला वय-४२,ओगदी पुरुष वय-४८,कोकमठाण महिला वय-५५,साखरवाडी पुरुष वय-६१,महिला वय-३०,चांदेकसारे पुरुष वय-६०,मढी बु.पुरुष वय-७३,माळेवाडी संगमनेर महिला वय-२६,डी.एच.ए.जे.(बोध होत नाही )कोपरगाव पुरुष वय-२५,२०,आदींचा समावेश आहे.

आजपर्यंत कोरोना नीचांकी पातळीवर होता,मात्र आता या पुढील काळात सरकारने जाहीर केल्याप्रमाणे नागरिकांना लग्न,दहावे,अंत्यविधी आदी ठिकाणी गर्दीत जाण्याचे टाळावे लागणार आहे.या खेरीज बाहेर हॉटेल मध्ये जेवण गर्दीची ठिकाणी टाळावे लागणार असून गर्दीवर नियंत्रण आणण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले आहे.सरकारने तसे नुकतेच नवीन नियम जाहीर केले आहे.मात्र उत्तोरोत्तर रुग्णवाढीचा आळा घालण्यात अपयश येत आहे.त्यामुळे आता कोपरगाव सह दहावी-बारावी वगळता शाळा जिल्ह्याधिकाऱ्यांनी बंद केल्या आहेत.त्यामुळे तालुक्यात नागरिकांत मोठी चिंता वाढली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close