कोपरगाव तालुका
कोपरगाव नगरपरिषदेची थकीत वसुलीसाठी गाळे सील करण्याची कारवाई,अनेकांचे धाबे दणाणले

कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव नगरपरिषदेच्या विविध व्यापारी संकुलातील गाळे धारकांकडे थकीत असलेल्या गाळा भाडे व संकलित व इतर कर वसुलीसाठी कोपरगांव नगरपरिषदेने आज कठोर कारवाई करत थक बाकीदाराविरुद्ध कडक कारवाई करताना गाळेच सील करण्याचा निर्णय घेतला असल्याने अनेकांनी आपले धनादेश वा रोख रक्कम देऊन या कारवाईतून आपली बोटे सोडवून घेतली आहे.
कोपरगाव नगरपरिषदेचे अनेक व्यापारी संकुलात अनेकांनीं लिलावात गाळे घेतले मात्र त्याची अनामत रक्कमच भरली नसल्याची व अनेकांनी राजकीय वशील्याचा वापर करून गाळे भाडे प्रचंड थकवले असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.
कोपरगाव नगरपरिषदेचे अनेक व्यापारी संकुलात अनेकांनीं लिलावात गाळे घेतले मात्र त्याची अनामत रक्कमच भरली नसल्याची व अनेकांनी राजकीय वशील्याचा वापर करून गाळे भाडे प्रचंड थकवले असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.ही बाब नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी कोणाचीही भीडभाड न ठेवता उघड केल्याने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
या नाठाळ थकबाकीदारा विरुद्ध पालिकेने कठोर कारवाई सुरू केल्याने या नाठाळ कुळांना धक्का बसला आहे.दिनांक २३ मार्च रोजी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली,उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांच्यासह मार्केट विभागाच्या पथकाने धडक कारवाई केली.या कारवाई मध्ये जुनी मराठी शाळा शॉपिंग कॉम्प्लेक्स व बी.ओ.टी.शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील सहा गाळे सील करण्यात आले असून काही गाळेधारकांनी भाडे व करापोटी जागेवर धनादेश व रोख रक्कम भरत कारवाई टाळली आहे.