कोपरगाव तालुका
काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात प्रदेशाध्यक्षांच्याच निर्धाराचा अभाव !
संपादक -नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा काल दुपारी पाच वाजेच्या सुमारास कोपरगांव शहरातील व्यापारी धर्मशाळेत निर्धार मेळावा आयोजित केला होता व त्याला काँगेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात येणार असल्याचे तालुका व शहर पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले होते मात्र प्रत्यक्षात ते आलेच नाही व त्यांच्या जागी आ. सुधीर तांबेच आल्याचे उघड झाले असून त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांची मोठी नाराजी झाली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्येकर्ते, पदाधिकारी, यांच्याशी चर्चा व विचारविनिमय करण्यासाठी, व कोपरगाव तालुक्यात लयाला गेलेले संघटन वाढविण्यासाठी तालुका काँग्रेने “निर्धार मेळाव्याचे” आयोजन केले होते.व त्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात,आ. सुधीर तांबे येणार असल्याचे कार्यकर्त्यांनी मोठे ढोल बडवले होते.मात्र काल एक तास उशिराने संपन्न झालेल्या बैठकीत आ. सुधीर तांबे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके,अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष अनिस शेख,जिल्हा काँग्रेसचे कार्यकारिणी सदस्य ज्ञानदेव वाफारे, आदी मान्यवर तर स्थानिक साई संस्थानचे माजी विश्वस्त अशोक खांबेकर,प्रांतिक सदस्य बाबुराव पंडोरे,तालुकाध्यक्ष नितीन शिंदे,शहराध्यक्ष सुनील साळुंके,आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आ. सुधीर तांबे म्हणाले कि,वर्तमानात काँग्रेस व भाजप यांच्यात फरक राहिलेला नाही बहुतांशी काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक भाजपात जात आहे.मात्र त्यांचा लवकरच भ्रमनिरास होणार आहे.आम्ही काँग्रेसशी एकनिष्ठ असून शेवट पर्यंत याच पक्षाबरोबर राहुन याच पक्षास साथ देणार आहोत.आमची संगमनेरची राजकारणाची सुसंस्कृत परंपरा या पुढेही सुरु ठेऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला व कोपरगावातही संगमनेर सारखा विकास करून दाखवू असे आश्वासन उपस्थितांना दिले आहे.काँग्रेस हि महात्मा गांधी,लाल बहादूर शास्त्री यांची असून त्याची विचारधारा पुन्हा प्रबळ करू.वर्तमानात देशात उद्योग बंद पडत असून तरुणांना नवीन रोजगार तर बाजूलाच राहिले पण आहे तो रोजगार हातातून जात आहे.तरुण वैफल्यग्रस्त झाले असून त्यांची नाराजी आगामी विधानसभा निवडणुकीत प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही.
सदर प्रसंगी अशोक खांबेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.त्यांनी कोपरगाव तालुक्यात राष्ट्रवादीचा कोपरगाव तालुक्यात तीन वेळा पराभव झाला असल्याने हि जागा काँग्रेसला सोडावी अशी मागणी आलेली.व तालुक्यात कुठलीही आर्थिक सत्ता नसतांना सुद्धा काँग्रेसवर प्रेम करणारे लोक अद्याप आहेत.या बाबत समाधान व्यक्त केले.
दरम्यान या कार्यक्रमाचे अगोदर पासून व्यापारी धर्मशाळा परिसरात गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे हे ठाण मांडून होते.त्या मुळे या कार्यक्रमाला येणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कुचंबणा होत होती.त्यामुळे या कार्यक्रमास उपस्थित कार्यकर्त्यांत सर्वत्र याचीच खमंग चर्चा सुरु होती.दरम्यान एका विश्वसनीय कार्यकर्त्याने या बाबत आगामी निवडणुकीच्या प्रचार कार्यालयासाठी त्यांना व्यापारी धर्मशाळेची नोंदणी करावयाची असल्याची असल्याने ते तेथे आले होते असे सांगीतले मात्र त्यांनी हीच वेळ का निवडली त्यावर तो निरुत्तर झाला आहे.
तालुका अध्यक्ष नितीन शिंदे यांनी आपल्या प्रास्तविकात,”कोपरगावला निळवंडेच्या पाण्याची गरज नसताना विनाकारण न होणाऱ्या कामाचे गाजर दाखवून प्रस्थापितांनी तालुक्यातील जनतेची फसवणूक सुरु ठेवली असल्या बद्दल नाराजी व्यक्त केली व नगरपालिकेचा पाच क्रमांकाचा साठवण तलाव होऊ द्यावा त्यात राजकारण आणू नये असे सांगून वैतरनेचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळवावें,येवलेकरांनी मांजरपाड्याचे पाणी वळवून दाखवले मग चाळीस वर्ष एकाच घरात सत्ता असताना यांनी उद्योगांना जाणारे पाणी का थांबवले नाही असा रास्त सवाल उपस्थित केला.मुख्यमंत्र्यांशी जवळचे संबंध असल्याचा प्रचार केला जातो मग पश्चिम घाटमाथ्यावरील पाणी पूर्वेला का वळवले नाही असा रोकडा सवाल केला.
कोपरगावला निळवंडेच्या पाण्याची गरज नसताना विनाकारण न होणाऱ्या कामाचे गाजर दाखवून प्रस्थापितांनी तालुक्यातील जनतेची घोर फसवणूक सुरु ठेवली आहे, प्रस्थापितांनी नगरपालिकेचा पाच क्रमांकाचा साठवण तलाव होऊ द्यावा त्यात राजकारण आणू नये असे सांगून वैतरनेचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळवावें,येवलेकरांनी मांजरपाड्याचे पाणी वळवून दाखवले मग चाळीस वर्ष एकाच घरात सत्ता असताना यांनी उद्योगांना जाणारे पाणी का थांबवले नाही -तालुकाध्यक्ष नितीन शिंदे
विकास काय असतो तो संगमनेरच्या नेत्यांकडून शिका अशी प्रस्थापितांना कोपरखिळी मारली.शिर्डी विमानतळ झाले या भागात वास्तविक सत्ताधाऱ्यांना औद्योगिक वसाहत आणता आली असती मात्र या कडे कोणीही लक्ष दिले नाही.आपल्याला मुंबई,ठाणे परिसरातील उद्योजकांचे फोन येतात व “तुमचे नेते या भागात औद्योगिक वसाहत का उभारत नाही”असा सवाल करतात त्यावेळी तालुक्यातील माणसांची या अकर्तृत्वामुळे नाचक्की होत असल्याची कबुली दिली आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शहराध्यक्ष सुनील साळुंके यांनी तर उपस्थितांचे आभार प्रवीण पोटे यांनी मानले.