जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

व्यापाऱ्यांची आत्महत्या,कोपरगावात अकस्मात मृत्यू नोंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील धारणगाव ग्रामपंचायत शिवारात रहिवासी असलेले आर.पी.आयचे कार्यकर्ते व लाकडाचे व्यापारी बाजीराव शंकर रणशूर (वय-५६) यांनी आपल्या स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला आज पहाटे कधीतरी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.त्यामुळे धारणगाव आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान मिळलेल्या माहितीनुसार त्यांच्यावर तालुक्यातील एका प्रसिद्ध सहकारी पतसंस्थेचे कर्ज होते त्यांनी त्यातील तीन लाख रुपयांचा हप्ता काही दिवसापुर्वी भरला होता.तरीही ते काही तरी अज्ञात कारणाने तणावात होते.त्यातून हि दुर्घटना घडली असल्याचे वृत्त स्थानिक ग्रामस्थ चर्चा करताना आढळून आले आहे.त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”धारणगाव शिवारात रहिवासी असलेले आर.पी.आय.चे कार्यकर्ते आणि रहिवासी असलेले इसम बाजीराव रणशूर हे अज्ञात कारणाने बऱ्याच दिवसापासून चिंतेत होते.त्यांनी आपल्या राहत्या घरी रात्री झोपलेले असताना दि.१९ मार्चच्या रात्री कधीतरी उठून घराबाहेर जाऊन आपल्या घराच्या बाहेर शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे.हि बाबत त्यांच्या पत्नीच्या आज पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास झोपेतून जाग आल्यावर लक्षात आली होती. त्यांनी आजूबाजूस शोध घेऊन पाहिले असता ते मिळून आले नाही त्यामुळे त्यांनी आपल्या मुलास उठवले होते.त्यावेळी त्यांनी आजूबाजूस शोध घेऊन पाहिले असता त्यांना आपल्या घराच्या उत्तरेस साधारण ७० फूट अंतरावर असलेल्या बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडाला लटकलेले आढळून आले होते.त्यांनतर त्यांनी हंबरडा फोडला असता हि बाब अन्य शेजारी नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या लक्षात आली होती.त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यानां खाली उतरून त्यांना उपचारार्थ कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती केले होते.तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यानीं त्यांना मृत घोषित केले आहे.

सदर इसम सुसंस्कृत समजला जात असताना अशी दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.त्यामुळे धारणगाव आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

घनास्थळी पोलीस निरीक्षक देसले व पो.ना.यांनी भेट दिली आहे.
त्यांच्या पश्चात दोन भाऊ,पत्नी,एक मुलगा असा परिवार आहे.त्यांच्यावर दुपारी १२.३० वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मुत्यु नोंद क्रं.२०/२०२३ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक आंधळे हे अधिकारी हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close