सण-उत्सव
कोपरगावात महाराष्ट्र दिनाकडे अनेकांचा कानाडोळा !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात आज सकाळी ०८ वाजेच्या सुमारास महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा झाला असला तरी या दिनासाठी माजी आ.स्नेहलता कोल्हे,संजीवणीचे कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे,कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती,जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्य,नगरपरिषदेचे बहुतांशी नगरसेवक विविध पक्षांचे पदाधिकारी शहर व तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी पाठ फिरवली असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
एरव्ही निवडणुका जवळ आल्या की या राष्ट्रीय राज्यस्तरीय सणांचा अनेकांना मोठा पुळका येतो मात्र वर्तमानात ओ.बी.सी.आरक्षणाच्या मुद्दा सर्वोच्च न्यायालयात अडकल्याने व अद्याप निवडणुका कधी होणार हे निश्चित नसल्याने अनेकांनी या मराठमोळ्या सणाकडे दुर्लक्ष करणे पसंत केले आहे.एरव्ही राष्ट्रीय व राज्यस्तरीय सण यांचा नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्याना भलताच पुळका येताना दिसतो.
महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्यच्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते.कोपरगाव तहसील कार्यालय,पंचायत समिती,कोपरगाव नगरपरिषदेचे प्रांगणात महाराष्ट्र दिनाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ही धक्कादायक बाब उघड झाली आहे.याबाबत शहर व तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान तहसील कार्यालयासमोर संपन्न झालेल्या ध्वजारोहण प्रसंगी आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते तर तहसीलदार विजय बोरुडे,पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत धजारोहन संपन्न झाले तर पंचायत समिती समोर प्रशासक तथा गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी ध्वजारोहन केले आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव पोलिसांनी महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रध्वजाला सलामी दिली आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,राजेंद्र वाकचौरे,पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,डॉ.अनिरुद्ध काळे,जिल्हा परिषद उपअभियंता उत्तम पवार,घोडके सर,माजी नगरसेवक रमेश गवळी,फकीर कुरेशी,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,दिलीप घोडके सर.कृषी विस्तार अधिकारी बाळासाहेब साबळे,लेखा अधिकारी गणेश सोनवणे,ग्रामपंचायत विस्तार अधिकारी दत्तात्रय रानमळ,आदी निवडक मान्यवर उपस्थित होते.
एरव्ही निवडणुका जवळ आल्या की या राष्ट्रीय राज्यस्तरीय सणांचा अनेकांना मोठा पुळका येतो मात्र वर्तमानात ओ.बी.सी.आरक्षणाच्या मुद्दा सर्वोच्च न्यायालयात अडकल्याने व अद्याप निवडणुका कधी होणार हे निश्चित नसल्याने अनेकांनी या मराठमोळ्या सणाकडे दुर्लक्ष केले आहे.एरव्ही राष्ट्रीय व राज्यस्तरीय सण यांचा नेत्यांना,विविध सामाजिक,राजकीय संघटना आणि त्यांच्या कार्यकर्त्याना भलताच पुळका येताना दिसतो सामाजिक संकेतस्थळावर शुभेच्छांचा महापूर येताना दिसतो मात्र वास्तविक पातळीवर हे देश प्रेम कुठे आटून जाते हे समजायला मार्ग नाही.विविध व्यासपीठावर नागरिकांना देश आणि राज्यप्रेमाचे डोस देण्याचे काम हेच नेते आणि त्यांचे कार्यकर्ते अव्याहतपणे करताना दिसतात.मात्र आता या राज्य प्रेमाबद्दल एवढी अनास्था का ? असा सवाल निर्माण झाला आहे.विरोधकांची गैरहजेरी एकवेळ समजू शकते असे मानले तरी शिवसेनेसह सत्ताधारी वर्गाच्या कार्यकर्त्यांची गैरहजेरी ही डोळ्यात खुपणारी आहे.याचे सत्ताधाऱ्यांनी अंतर्मुख होऊन परीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सदर प्रसंगी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी अनुपस्थित नेत्यांच्या या अनास्थेबद्दल कठोर शब्दात टीका केली आहे.व मतांसाठी आगामी निवडणुकांत कसे एकमेकांच्या पुढे पळतील हे थोड्याच दिवसात दिसणार असल्याचे म्हटले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुरेश गोरे सर यांनी केले तर महाराष्ट्र गाणं श्रीमान गोकुलचंद विद्यालयातील विद्यार्थिनींनीनी केले आहे या प्रसंगी उपस्थितांचे आभार चंद्रशेखर कुलथे यांनी मानले आहे.