निधन वार्ता
यमुनाबाई भाकरे यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर-(वार्ताहर)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ( लक्ष्मणवाडी ) येथील जुन्या पिढीतील वयोवृद्ध महिला यमुनाबाई बाबुराव भाकरे यांचे गुरुवार दि.२० एप्रिल रोजी निधन झाले आहे.मृत्यू समयी त्यांचे वय ९० वर्षे होते.त्यांच्यावर संवत्सर येथे गोदावरी काठावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत.यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
स्व.धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाने त्या संवत्सर पंचक्रोशीत परिचित होत्या.पतीच्या निधनानंतर यमुनाबाई यांनी मुलांचा सांभाळ करुन त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले.घर आणि शेती सांभाळून एक आदर्श गृहिणी म्हणून नावलौकीक मिळविला होता.
कै.यमुनाबाई भाकरे या प्रगतशील शेतकरी व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र बाबुराव भाकरे,डॉ.विलास बाबुराव भाकरे यांच्या मातोश्री तर युवक कार्यकर्ते अजय भाकरे व सागर भाकरे यांच्या आजी होत.त्यांच्या पश्चात सुना,नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार आहे.
स्व.भाकरे यांच्या निधनाबद्दल जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे,महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे,पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे,संवत्सर ग्रामपंचायतीचे उप सरपंच विवेक परजणे,सरपंच सुलोचना ढेपले यांनी शोक व्यक्त करन श्रध्दांजली वाहिली.के.यमुनाबाई यांच्यावर संवत्सर येथे गोदावरी काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले.याप्रसंगी विविध क्षेत्रातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.