कोपरगाव तालुका
कोपरगावात शिव जयंती निमित्त..या नेत्यांकडून अभिवादन
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्यास आ.आशुतोष काळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिव जयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी असते.
यावेळी कोपरगाव शहरातील विविध ठिकाणी साजऱ्या करण्यात आलेल्या शिवजयंती निमित्त वविध मंडळांना भेटी देवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले.स्वराज्यनिर्माता प्रतिष्ठाण,महावितरण कार्यालय,अशोका ग्रुप,साई संकेत मोबाईल शॉपी,खडकी आदी ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती सोहळ्यास हजर राहून शिवप्रेमींचा उत्साह वाढविला तसेच सेवा फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास भेट दिली.यावेळी त्यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
याप्रसंगी कोपरगाव पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक पद्मकांत कुदळे,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे, संदीप पगारे,राजेंद्र वाकचौरे,अजीज शेख,गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,फकीर कुरेशी,रमेश गवळी,दिनकर खरे,डॉ.तुषार गलांडे,राहुल देवळालीकर,अशोक आव्हाटे,राजेंद्र आभाळे,राजेंद्र वाकचौरे,राजेंद्र खैरनार,दिनेश पवार,वाल्मिक लहिरे,धनंजय कहार,राजेंद्र जोशी,जावेद शेख,प्रकाश दुशिंग,इम्तियाज अत्तार,विजय चवंडके,आकाश डागा,सागर लकारे,ऋषिकेश खैरनार,एकनाथ गंगूले,संदीप देवळालीकर,गोरख पंडोरे,अंबादास वडांगळे,समीर वर्पे,दीपक देशमुख,बाळासाहेब शिंदे,अशोक लांडगे,शिवा लकारे, विकास बेंद्रे, हारूण शेख,ठकाजी लासुरे,विद्युत तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय उपसरचीटणीस नितीन पवार,धीरज भिंगारदिवे,नाना गोर्डे,अनिल शिरसाठ,रवींद्र फल्ले,शिरीष वाणी,श्री. गाडेकर,अमर आव्हाड,रवींद्र भुजबळ,अनिरुद्ध पगारे,मयूर अष्टेकर,संतोष मोरे,अतिरिक्त कार्यकारी अभियंता भगवंत खराटे,उपकार्यकरी अभियंता दिनेश चावडा, महावीतरणचे कर्मचारी व नागरिक आदींसह कार्यकर्ते व शिवप्रेमी उपस्थित होते.