कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांसाठी मोठ्या निधीची गरज-आ.काळे
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागात रस्ते विकासाचा अनुशेष खूप मोठा आहे.त्यासाठी लेखाशीर्ष ३०५४ अंतर्गत ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीसाठी जास्तीत जास्त निधी द्यावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी नासिक येथे एका बैठकीत अर्थमंत्री अजीत पवार यांचेकडे केली आहे.
कोपरगांव येथील वळूमाता प्रक्षेत्राच्या मालकीच्या ९५ एकर क्षेत्रास तटरक्षक भिंत बांधणे व ऑफिस,शेडची सुधारणा करण्यासाठी व पशु वैदयकीय दवाखाना कर्मचारी निवासस्थानासाठी तसेच उजनी प्रकल्पासाठी स्वतंत्र फिडर करिता ३ किमी अंतराची वीज वाहिनी देणेसाठी निधी मिळावा-आ.आशुतोष काळे
बुधवार (दि.१०) रोजी नाशिक येथे विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा वार्षिक आराखड्या संदर्भात उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली.यावेळी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ,उर्जा राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे,जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा ना.राजश्री घुले,आ.आशुतोष काळे,संग्राम जगताप,डॉ.किरण लहामटे,जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके,नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देवशिष चक्रवर्ती,उपसचिव व्ही.एफ.वसावे,जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले,जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश शिंदे,जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे यांच्यासह विविध कार्यान्वयीन यंत्रणांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.या बैठकीत वाढीव प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे.
यावेळी आ.काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याकडे कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विविध विकास कामांकडे लक्ष वेधून निधीची मागणी केली.नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची मोठी मदत होत असून मतदार संघातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधी द्यावा तसेच मतदार संघातील ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्रातील देवस्थानासाठी निधी मिळावा.कोपरगांव येथील वळूमाता प्रक्षेत्राच्या मालकीच्या ९५ एकर क्षेत्रास तटरक्षक भिंत बांधणे व ऑफिस,शेडची सुधारणा करण्यासाठी व पशु वैदयकीय दवाखाना कर्मचारी निवासस्थानासाठी तसेच उजनी प्रकल्पासाठी स्वतंत्र फिडर करिता ३ किमी अंतराची वीज वाहिनी देणेसाठी निधी मिळावा अशी मागणी आ.काळे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. सदर मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत निधी देण्यास त्यांनी हिरवा कंदील दिला असल्याची माहिती आ.काळे यांनी दिली आहे.