कोपरगाव तालुका
भारतीय संस्कृती हा प्रत्येक कुटुंबाचा कणा-अध्यक्ष कोयटे
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारतीय संस्कृती हा प्रत्येक परिवाराचा कणा आहे.त्यामुळे आज भारतीय कुटुंब संस्कार व संस्कृती टिकून आहे.त्यांचा आदर करणे प्रत्येक घरातील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन राज्य पतसंस्था फेडरेशचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी कोपरगाव शहरातील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
प्रभाग क्र.२ मधील नगरसेवक जनार्दन कदम व नगरसेविका दिपा गिरमे हे चांगले लोकसेवक असून त्यांचा जेष्ठ नागरिक मित्र मंडळाचे उपक्रमांना नेहमीच पाठींबा असतो.नगर मित्रमंडळाच्या वतीने जेष्ठ-श्रेष्ठ नागरिकांसाठी जास्तीत जास्त उपक्रम राबवुन त्यांची मानसिक व शारीरिकदृष्ट्या काळजी घेत आहोत-ओमप्रकाश कोयटे-अध्यक्ष,समता सहकारी पतसंस्था कोपरगाव.
कोपरगाव शहरांतील निवारा मित्रमंडळ ट्रस्ट संचलित श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या वतीने निवारा,सुभद्रानगर,कोजागिरी कॉलनी,ओमनगर,द्वारकानगरी, जानकीविश्व,रिद्धीसिद्धी नगर,आढाव वस्ती,शंकरनगर,आदि परिसरातील जेष्ठ-श्रेष्ठ नागरिक व महिलांसाठी तिळगुळ व हळदी-कुंकू समारंभ नुकताच महादेव मंदिरा समोरील प्रांगणात उत्साहात संपन्न झाला आहे.त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे,नगरसेवक जनार्दन कदम,दीपा गिरमे,पुष्पलता सुतार,सौ.कर्डक,विष्णुपंत गायकवाड,सुभाष पाटणकर,मंगल बुचके,आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले कि,”प्रभाग क्र.२ मधील नगरसेवक जनार्दन कदम व नगरसेविका दिपा गिरमे हे चांगले लोकसेवक असून त्यांचा जेष्ठ नागरिक मित्र मंडळाचे उपक्रमांना नेहमीच पाठींबा असतो.नगर मित्रमंडळाच्या वतीने जेष्ठ-श्रेष्ठ नागरिकांसाठी जास्तीत जास्त उपक्रम राबवुन त्यांची मानसिक व शारीरिकदृष्ट्या काळजी घेत आहोत.निवारा परिसरातील प्रत्येक जेष्ठ-श्रेष्ठ नागरिकाची काळजी घेणे हि श्रेष्ठ नागरिक मित्रमंडळाची जबाबदारी असून त्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत,जेष्ठांनी देखील स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे’.
कार्यक्रमाचे प्रास्तविक पुष्पलता सुतार यांनी केले तर उपस्थितांना नगरसेवक जनार्दन कदम,दीपा गिरमे,विष्णुपंत गायकवाड आदींनी मार्गदर्शन केले आहे.
कार्यक्रम यशस्वितेसाठी श्रेष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.निवारा परिसरासह आजूबाजूच्या परिसरातील सर्व जेष्ठ-श्रेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि उपस्थितांचे आभार समता वार्ता मासिकाचे सहसंपादक पोपट साळवे यांनी मानले.