जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

पेट्रोल डिझेल व गॅस दर वाढी विरोधात शिवसेनेचे जनआंदोलन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल व गॅसचे दर अति प्रमाणात वाढवल्यामुळे सामान्य नागरिक या महागाईच्या भडक्यात भरडले गेले आहे.आधीच कोरोना महामारी मुळे व्यावसायिक,शेतकरी यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झालेले असताना केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल व गॅसचे दर वाढवल्यामुळे जनतेत संताप पसरला असून पेट्रोल डिझेल व गॅसचे दर कमी करावे अन्यथा मोठ्या प्रमाणात जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कोपरगाव शहर व तालुका असे शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन देण्यात आला आहे.

केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून इंधनाची दरवाढ सामान्य नागरिकांच्या पाचवीला पुजली आहे.यात कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर प्रतिकूल परिणाम होता आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाचे दर कमी झाले तरी केंद्राने आपले दर वाढीवच ठेवले आहे.परिणामी सामान्य नागरिक हैराण झाले आहे त्याची प्रतिक्रिया कोपरगावात उमटली आहे.

केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून इंधनाची दरवाढ सामान्य नागरिकांच्या पाचवीला पुजली आहे.यात कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर प्रतिकूल परिणाम होता आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाचे दर कमी झाले तरी केंद्राने आपले दर वाढीवच ठेवले आहे.परिणामी सामान्य नागरिक हैराण झाले आहे.या विरोधात आवाज उठविण्यासाठी शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिवसेनेला आंदोलन करण्याचा आदेश दिला आहे त्याची अंमलबजावणी कोपरगाव शहरात करण्यात आली आहे.व केंद्राच्या या अत्याचारी धोरणाच्या विरुद्ध दंड थोपटलें आहे.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे,ज्येष्ठ शिवसैनिक कुक्कूशेठ सहानी,तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे,शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल,विधानसभा संघटक असलम शेख,एस.टी.कामगार सेनेचे शहरप्रमुख भरत मोरे,ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख मुकुंद सिनगर,डाऊच खुर्दचे सरपंच संजय गुरसळ,वाहतूकसेना जिल्हाप्रमुख इरफान शेख,विक्रांत झावरे,उपशहरप्रमुख विकास शर्मा,प्रफुल्ल शिंगाडे,गगन हाडा,गोपाळ वैरागळ,आकाश कानडे,शहर संघटक बाळासाहेब साळुंके,विभाग प्रमुख रफिक शेख,मयूर दळवी,व्यापारी सेनेचे योगेश मोरे,दत्तात्रय झावरे,अंबादास वाघ,विशाल झावरे,विजय सोनवणे,सचिन आसने,अक्षय नन्नवरे,निशांत झावरे,वाहतूक सेनेचे तालुकाप्रमुख पप्पू पेकळे,उपतालुकाप्रमुख अविनाश धोक्रट,शहरप्रमुख जाफर सय्यद,उपशहरप्रमुख राकेश वाघ,प्रवीण शेलार,किरण अडांगळे,पिनू सावतडकर,वैभव हलवाई,श्रीपाद भसाळे,महिला आघाडी जिल्हाप्रमुख सपना मोरे,नगरसेविका वर्षा शिंगाडे,उपतालुकाप्रमुख सारिका कुहिरे,शहरप्रमुख राखी विसपुते,उपशहरप्रमुख अश्विनी होने,शितल चव्हाण,अक्षता आमले,ग्राहक संरक्षण कक्षाचे राहुल देशपांडे,सतीश शिंगाणे,चंद्रहंस पाबळे,सतीश लोळगे आदी शिवसैनिक उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close