कोपरगाव तालुका
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देण्याची गरज
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव( प्रतिनिधी)
केवळ गुणांच्या फुगलेल्या आकडेवारीवरून गुणवत्ता सिद्ध होत नसून शिक्षकांनी शाळेच्या निकालावर भर न देता स्कॉलरशिप,प्रज्ञा शोध परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संधी निर्माण करून त्यांच्या अन्य गुणवत्ता वाढीकडे लक्ष पुरवुन त्यांचा सर्वांगीण विकास साधता आला पाहिजे असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी पोहेगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील ग.र.औताडे पाटील पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत जिल्हा परिषद सदस्या सोनाली रोहमारे यांच्या निधीतून चांदेकसारे जिल्हा परिषद गटातील गरजु विद्यार्थी-विद्यार्थिनींना सायकल वाटप तसेच स्व.ग.र.औताडे पाटील पुतळा परिसर सुशोभीकरण व संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन आ.काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कोपरगाव पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक सुनील शिंदे,सचिन रोहमारे,काकासाहेब जावळे,आनंदराव चव्हाण,जिल्हा परिषद सदस्या सोनाली रोहमारे,पंचायत समिती सदस्या अनुसया होन,रोहिदास होन,संदीप रोहमारे,राहुल रोहमारे,एम.टी.रोहमारे,दिलीप औताडे,वाल्मिक नवले,नंदकिशोर औताडे,संजय रोहमारे,राहुल जगधने,सचिन मुजगुले,गोपीनाथ रहाणे,जयंत रोहमारे,देवेन रोहमारे,मधुकर औताडे,भाऊसाहेब सोनवणे,एकनाथ औताडे,नरहरी रोहमारे,गवळी सर,बांगर सर,राजेंद्र औताडे,शिक्षक,विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”प्रत्येक विद्यार्थ्याने आपण कोणत्या परिस्थितीतून आलो याचा विचार न करता आपल्याला जे उद्दिष्ट्य साध्य कारायचे त्याचा विचार करावा.ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी पुस्तकांची भूमिका अतिशय महत्वाची आहे.विद्यार्थ्यांनी स्वत:चा शैक्षणिक विकास साधत असतांना आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच पुस्तक वाचनावर भर देवून अभ्यासाचे व खेळाचे वेळापत्रक तयार करून प्रगतीची शिखरे गाठावी असा मौलिक सल्ला यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला आहे.