कोपरगाव तालुका
माजी खा.काळे यांचे कार्य दिपस्तंभाप्रमाणे-लक्षवेधी
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कर्मवीर शंकरराव काळे यांनी सामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांच्या,कष्टकऱ्यांच्या मुलांना उपलब्ध करून दिले.शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सहकार,सामाजिक व राजकीय क्षेत्रात लक्षवेधी कामगिरी केली असून कर्मवीर काळे यांनी केलेले कार्य हे दीपस्तंभा प्रमाणे असल्याचे जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी केले आहे.
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सुशीलामाई काळे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कर्मवीर शंकरराव काळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित ऑनलाईन स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की,”क्विक आणि फास्ट हि आजच्या काळाची गरज आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचा विचार करून जीवनात येणाऱ्या संघर्षाला स्विकारून मिळणाऱ्या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन केले आहे.
त्या पुढे म्हणाल्या की,”क्विक आणि फास्ट हि आजच्या काळाची गरज आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचा विचार करून जीवनात येणाऱ्या संघर्षाला स्विकारून मिळणाऱ्या संधीचा फायदा घ्यावा असा सल्ला दिला”.
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक स्वामीराज भिसे प्रमुख अतिथी व प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.यावेळी बोलतांना स्वामीराज भिसे म्हणाले की,विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात आपली कौशल्ये जोपासावीत व आपल्या क्षमतेचा पुरेपूर उपयोग करून स्वत:चे करिअर घडवावे. पुस्तकांचे वाचन करून सभोवतालची माणसे व परिसर वाचायला शिकले पाहिजे असे आपल्या मनोगतात सांगितले. स्पर्धा परीक्षक डॉ.कैलास महाले यांनी यावेळी कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांच्या कार्याला उजाळा दिला. याप्रसंगी प्रा. विठ्ठल लंगोटे, उपस्थित होते. या कार्यक्रमात आय.एस.ओ.लीड ऑडिटर अनिल येवले यांनी सौ.सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास आय.एस.ओ.मानांकन प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव चैताली काळे यांना प्रदान केले.कार्यक्रमाचे प्रास्तविक स्वागत प्राचार्या डॉ. विजया गुरसळ यांनी केले.सूत्रसंचलन प्रा.चांगदेव खरात व प्रा.उमाकांत कदम यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ.निर्मला कुलकर्णी यांनी मानले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक स्वागत प्राचार्या डॉ. विजया गुरसळ यांनी केले.सूत्रसंचलन प्रा.चांगदेव खरात व प्रा.उमाकांत कदम यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ.निर्मला कुलकर्णी यांनी मानले आहे.