कोपरगाव तालुका
कोपरगावात चिमणी-पाखरू नावाचा जुगार खेळताना एकास अटक
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरंगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील हॉटेल किशोर ग्रँट समोर काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका पत्री शेडमध्ये “चिमणी-पाखरू” हा पैशावर खेळला जाणारा सोरट नावाचा जुगार खेळताना आरोपी संतोष रामदास सोनटक्के (वय-२७) रा.दत्तनगर कोपरगाव यास शहर पोलिसानी अटक केली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे अवैध व्यवसायिकांत खळबळ उडाली आहे.
पोलीस निरीक्षक वर्धमान गवळी यांना शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या खुले नाट्यगृहाशेजारी असलेल्या हॉटेल किशोर ग्रँट या हॉटेलच्या समोर असलेल्या एका पत्री शेडमध्ये आरोपी संतोष सोनटक्के हा काल सायंकाळच्या सुमारास आपल्या टपरित बेकायदा विनापरवाना लोकांकडून पैसे घेऊन “चिमणी-पाखरू” हा सोरट नावाचा हारजीतीचा खेळ खेळतांना आढळून आला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात वर्तमानात मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय वाढले आहे.त्यावर पोलिसांचा अंकुश कमी झाला आहे.गुन्हेगारांना पोलिसांची भीती वाटेनाशी झाली आहे.त्यामुळे या अवैध व्यावसायिकांवर अंकुश लावणे गरजेचे बनले आहे.त्याची दखल वर्तमानात कोपरगाव शहर पोलिसानी घेतल्याचे दिसत आहे.पोलीस निरीक्षक वर्धमान गवळी यांना शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या खुले नाट्यगृहाशेजारी असलेल्या हॉटेल किशोर ग्रँट या हॉटेलच्या समोर असलेल्या एका पत्री शेडमध्ये आरोपी संतोष सोनटक्के हा काल सायंकाळच्या सुमारास आपल्या टपरित बेकायदा विनापरवाना लोकांकडून पैसे घेऊन “चिमणी-पाखरू” हा सोरट नावाचा हारजीतीचा खेळ खेळतांना आढळून आला आहे.त्याच्याकडून शंभर.पन्नास,वीस,दहा रुपयांच्या अनेक नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.त्याला कोपरगाव शहर पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.
त्या आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.४२/२०२१ मुंबई जुगार कायदा कलम १२(अ) प्रमाणे फिर्यादी पो.कॉ.संभाजी भीमराज शिंदे (वय-३०) यांनी गुन्हा दखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बी.एस.कोरेकर हे करीत आहेत.