जाहिरात-9423439946
विधी व न्याय विभाग

कोपरगाव विधी समितीकडून संजीवणीच्या विद्यार्थिनीस मिळाला न्याय-माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संजीवनी के.बी.पी.तंत्रनिकेतन येथे संगणक तंत्र महाविद्यालयांत प्रवेश घेतलेल्या सिन्नर तालुक्यातील विघनवाडी येथील विद्यार्थिनीं कु.जान्हवी सोमनाथ कडलग हिचा वैद्यकीय कारणाने प्रवेश रद्द केला असता तिचे शैक्षणिक शुल्क व मूळ प्रवेश कागदपत्रे देण्यास नकार देणाऱ्या संजीवनी शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापना विरुध्द कोपरगाव येथील विधी समिती समोर दाखलपूर्व प्रकरण चालविण्यात येऊन त्यात संस्था प्रशासनास आपला निर्णय मागे घ्यावा लागला असून विद्यार्थिनींचे प्रवेश कागदपत्रे परत द्यावे लागले असल्याची माहिती अड्.दिलीप लासुरे यांनी आमच्या प्रतिनिधीकडे दिली आहे.

“कोपरगाव तालुक्यात सामान्य शेतकऱ्यांच्या पैशावर उभ्या राहिलेल्या शैक्षणिक संस्था असून कोल्हे कुटुंब त्या खाजगी मालमत्ता असल्यासारखे वागत आहे.व शेतकऱ्यांच्या मूलांवर अन्याय करत आहे.असेच चालू राहिले तर मा.उच्च न्यायालयात सहकारी साखर कारखान्यांवर निवडुन येणाऱ्या संचालक मंडळाचीच ट्रस्टी म्हणून कायद्याने नियुक्ती करणे न्यायाचे राहील व शैक्षणिक संस्था शेतकऱ्यांच्या मालकीच्या राहतील”-अड्.दिलीप लासुरे,विधीज्ञ,कोपरगाव न्यायालय.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ला गतवर्षी मंजुरी देण्यात आली.शालेय आणि उच्च शिक्षणात मोठ्या प्रमाणात परिवर्तनात्मक सुधारणांना यात मोठा वाव देण्यात आला आहे.२१ व्या शतकातले हे पहिले शिक्षण धोरण असून ३४ वर्ष जुन्या १९८६ च्या शिक्षणावरच्या राष्ट्रीय धोरणाची जागा नवे धोरण घेणार आहे.सर्वांना संधी,निःपक्षपात,दर्जा,परवडणारे आणि उत्तरदायित्व या स्तंभा वर याची उभारणी करण्यात आली आहे.२०३० च्या शाश्वत विकास कार्यक्रमाशी याची सांगड घालण्यात आली आहे.शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण अधिक समग्र,बहू शाखीय,२१व्या शतकाच्या गरजांना अनुरूप करत भारताचे चैतन्यशील प्रज्ञावंत समाज आणि जागतिक ज्ञान महासत्ता म्हणून परिवर्तन घडवण्याचा आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या आगळ्या क्षमता पुढे आणण्याचा सरकारच्या या धोरणाचा उद्देश आहे.असे असले तरी तो त्यांच्याच पक्षाचे स्थानिक नेते आणि त्यांच्या संस्था राज्यात हरताळ फासताना दिसत आहे.कोपरगाव तालुक्यात नामदेवराव परजणे विधी महाविद्यालया पाठोपाठ अशी तालुक्यात दुसरी घटना उघड झाली आहे.त्यामुळे पालकांत या संस्था चालकांविरुद्ध नाराजी व्यक्त होत आहे.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील विघनवाडी येथील विद्यार्थिनी कु.जान्हवी कडलग हिने कोपरगाव शहरानजीक असललेल्या संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेत १० ऑक्टोबर रोजी ०६ हजार ७०० रुपयांचे शुल्क भरून ‘संगणक तंत्रविद्या पदविका’ शाखेत प्रवेश घेतला होता.त्याचा पावती क्रमांक १६५५ होता.प्रवेश घेतल्यानंतर तिला पोटदुखीचा त्रास होऊ लागला.तिच्या कुटूंबायांनी तिला एका खाजगी रुग्णालयात भरती केले होते.वैद्यकीय उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तिला प्रवास न करण्याचा सल्ला दिला होता.या शिवाय महाविद्यालयाच्या सोयीसुविधा व सुरक्षिततेच्या कारणावरून येणे जाणे गैरसोयीचे ठरत होते.त्यामुळे तिने सदरचा प्रवेश रद्द करून शुल्क परत मागितले होते.व मात्र महाविद्यालयीन प्रशासनाने तिला उडवाउडवीची उत्तरे देण्यास प्रारंभ केला होता.व तिंचा प्रवेश तसाच ठेंवण्यास प्रशासन तिला बाध्य करत होते.त्यामुळे शिक्षण हक्क तरतुदीचा भंग होत होता.कायद्याने तंत्रनिकेतनचे शिक्षण घेण्यास कोणीही बाध्य करू शकत नाही.या शिवाय तिला पुढील वैद्यकीय उपचारासाठी प्रवेशासाठी भरलेल्या शुल्काची नितांत आवश्यकता होती.त्यामुळे सदरचे शुल्क व सोबत दिलेले कागदपत्र अर्ज करून परत मागीतले होते.मात्र शिक्षण संस्थेने ते देण्यास चक्क नकार दिला होता.त्यामुळे या विद्यार्थिनींचे व तिच्या पालकांचे सर्व प्रयत्न थकल्यावर त्यांनी कोपरगाव येथील विधीज्ञ दिलीप लासुरे यांची मदत मागीतली होती.

अड्.लासुरे यांनी कोपरगाव तालुका विधी सेवा समितीकडे अपिलपूर्व अर्ज दाखल केला होता.त्या प्रकरणी संस्थेचे प्राचार्य यांना हजर होण्याचे सांगण्यात आले होते.या प्रकरणी ते नुकतेच हजर झाले होते.त्या बाबत विधी सेवा समितीसमोर हजर होऊन त्यात तडजोडीची बोलणी झाली व अंती त्या प्रकरणात संस्थेचा प्राचार्यांना सदर विद्यार्थिनींचे प्रवेशासाठी दिलेले मूळ कागदपत्रे देण्याचे सांगितले गेले आहे.त्यामुळे विद्यार्थिनी कु.जान्हवी कडलग व तिचे पालक सोमनाथ कडलग यांनी विधी समितीचे व मोफत विधी सहाय्य पुरविणारे अड्.दिलीप लासुरे यांना धन्यवाद दिले आहे.

या घटनेची नगर व नाशिक जिल्ह्यातील कोपरगाव,सिन्नर तालुक्यात जोरदार चर्चा सुरु असून पालकांनी याबत विधी समितीने शिक्षण संस्थांना चाप लावल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close