कोपरगाव तालुका
आ.काळेंच्या हस्ते रवंदेत पोलिओ डोस
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र रवंदे येथे आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते बालकांना पोलिओ डोस पाजून पोलिओ लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला आहे.
पोलिओला देशातून कायमचे हद्दपार करण्यासाठी ० ते ५ ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओ डोस देणे अत्यंत गरजेचे आहे.आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांच्या पालकांनी आपल्या बालकांना पोलिओ डोस देवून या पोलिओ लढ्यात सहभागी होवून आरोग्याच्या दृष्टीने देशाची सदृढ व सक्षम पिढी निर्माण करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक अशोकराव काळे,जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते,पंचायत समिती सदस्य अनिल कदम,बाळासाहेब कदम,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी आदी मान्यवरांसह प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.