कोपरगाव तालुका
नागरिकांचे आरोग्यासाठी हृदयरोग तपासणी शिबीर – आशुतोष काळे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य आबाधित राहाण्यासाठी कोपरगाव विधानसभा मतदार संघात माजी आमदार अशोक काळे यांच्या वाढदिवसानिमित्त हृदयरोग तपासणी शिबीर आयोजित केले असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव येथील कर्मवीर प्रतिष्ठान व नाशिक येथील वोक्हार्ट हॉस्पिटल यांचे संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यातील वारी ग्रामपंचायत हद्दीत आरोग्य केंद्र या ठिकाणी मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी सभापती मधुकर टेके हे होते.
या प्रसंगी चारूदत्त सिनगर,डॉ चंद्रशेखर आव्हाड, आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते,डॉ.संकेत गायकवाड,.सुरेश जाधव,प्रसाद साबळे, सतिश कानडे ,अशोक निळे,विजय गायकवाड, महेंद्र बागुल, संजय जाधव,शरद जोशी, ताराचंद पडघलमल, अनंत सुर्यवंशी, राहुल टेके,सुकदेव मुसळे, नाना टेके, भास्कर आदमणे, रवि पांडे, रामनाथ करवा,नाना नेवगे,रामा मोरे, गोरख लांडगे, अशोक बोर्डे, मनोज वाघमारे , डॉ. महेश पाटील व त्यांचे सहकारी कर्मविर प्रतिष्ठाणचे राजेंद्र आभाळे,राजेंद्र बोरावके, राजेंद्र बोरावके सचिन बढे,नितिन बनसोडे,प्रदिप कु-हाडे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काही दशकांपूर्वी शेतीचे कामे करतांना कोणत्याही प्रकारची आधुनिक औजारे नव्हती. शेतीची पेरणी,नांगरणी आदी कामे बैलाच्या सहाय्याने करतांना चांगल्या प्रकारे शारीरिक कष्ट होत होते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना सहजासहजी दवाखान्यात जाण्याची गरज पडत नव्हती,
त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,काही दशकांपूर्वी शेतीचे कामे करतांना कोणत्याही प्रकारची आधुनिक औजारे नव्हती. शेतीची पेरणी,नांगरणी आदी कामे बैलाच्या सहाय्याने करतांना चांगल्या प्रकारे शारीरिक कष्ट होत होते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना सहजासहजी दवाखान्यात जाण्याची गरज पडत नव्हती, परंतु आधुनिकतेच्या युगात यांत्रिकीकरण झाल्यामुळे शेतीचे श्रम कमी झाले आहे. जवळपास बहुतांशी कामे यंत्र सामुग्रीच्या माध्यमातून होत असल्यामुळे नागरिकांना निरनिराळ्या व्याधींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांची या व्याधीतून मुक्तता व्हावी हा या हृदयरोग तपासणी शिबीराचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.या हृदयरोग तपासणी शिबिरामध्ये डॉ. महेश पाटील यांनी हृदयरुग्णांची तपासणी केली. या शिबिरास रुग्णांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.