कोपरगाव तालुका
कोपरगावच्या नेत्यांचे सामाजिक कार्य अतुलनीय,प्रचाराची गरज नाही-वहाडणे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे कार्य गोदावरीस नुकत्याच येऊन गेलेल्या महापुराच्या वेळी नागरिकांनी पहिले असल्याने आगामी निवडणूक काळात या नेत्यांना मतदारसंघात फिरण्याची गरज उरलेली नाही त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांनी बाहेर न फिरताच निवडणूक लढवावी असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये नुकतेच केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की,कोपरगाव शहर व तालुक्यात येऊन गेलेल्या महापुरामुळे नागरिकांची,लहान-मोठ्या व्यापाऱ्यांची मोठी हानी झाली.त्या संकटाचा मुकाबला सर्वांनीच एकजुटीने केला.त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात हानी सांगली-कोल्हापूर शहर व जिल्ह्यात महापुरामुळे झाली.त्या भागात आलेल्या महाभयानक महापुरामुळे नागरिक,व्यावसायिक,शेतकरी शतप्रतिशत उध्वस्त झाला आहे.पुढील दोन पाच वर्षे तरी हि परिस्थिती पूर्वपदावर येणे कठिण आहे. या पूरग्रस्तांना केंद्र व महाराष्ट्र शासन,सर्वच राजकिय पक्ष,संघटना यांनी सर्वप्रकारचे भेद-मतभेद विसरून मदत केली.अनेकांनी गणेशोत्सवाची रक्कमही पूरग्रस्तांना पाठविली.कोपरगावातूनही सर्वांनीच मदत पाठविली,प्रत्यक्ष मदत कार्यात भागही घेऊन आपले सामाजिक दायित्व पार पाडले.
कोपरगावच्या नेत्यांनीही सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्या पूरग्रस्तांना मोठी मदत पाठविली.आता सर्वच राजकिय पक्षांच्या नेत्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणताही खर्च न करता कोट्यावधी रुपये निधी जर सांगली-कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी पाठविला तर मोठे सामाजिक कार्य होऊन कोपरगावची मान संपूर्ण देशात उंचावल्याशिवाय राहणार नाही.
कोपरंगावतील सर्वच राजकिय पक्षांच्या नेत्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणताही खर्च न करता कोट्यावधी रुपये निधी जर सांगली-कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी पाठविला तर मोठे सामाजिक कार्य होऊन कोपरगावची मान संपूर्ण देशात उंचावल्याशिवाय राहणार नाही.
पूरग्रस्तांबद्दल किती तळमळ आहे हे कोपरगावच्या लोकप्रतिनिधी व सर्वच पक्षांच्या नेत्यांनी दाखवून दिलेलेच आहे.येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत खरे तर संभाव्य उमेदवारांनी खर्च करण्याची काहीच आवश्यकता नाही.कारण,बहुतांश उमेदवारांनी शहर व तालुक्याचा केलेला विकास सर्वच जनतेला चांगलाच (?) माहिती असल्याने व तोच विकास वृत्तपत्रांच्या गुळगुळीत पुरवण्यात छापून आलेला असल्यामुळे मतदारांना पुन्हा सांगण्याची काहीच गरज नाही.आपले सर्वच संभाव्य उमेदवार या सूचनेचा नक्कीच विचार करतील. खरे तर विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उमेदवारांनी प्रचार करणे,मतदारसंघात फिरणे,स्वतःच्या घामाचा पैसा खर्च करणे टाळावे.सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल करून स्वतःच्या घरात बसून आराम करावा व मतदारांना त्यांचा निर्णय घेण्यासाठी मुक्त संधी द्यावी अशी कोपरखिळी त्यांनी तालुक्यातील प्रस्थापित नेत्यांचे नाव न घेता लगावला आहे.