जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

राष्ट्रीय सणानिमित्त कोपरगाव नगरपरिषदेचा नाविन्यपूर्ण पायंडा

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राष्ट्रीय सणा निमित्त ध्वजारोहण मान्यवर प्रतिनिधी अथवा पदाधिकारी यांना टाळून नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनीं आरोग्य सेवक,अधिकारी,शहिद वीर जवान हवाई दल अधिकारी,कर्मचारी संघटनेचे प्रमुख आदींना संधी देऊन सामान्य माणूस व त्यांच्या कार्याचा गौरव वाढवला असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नुकत्याच संपन्न झालेल्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्त कोपरगाव नगरपरिषद कार्यालयात झालेले ध्वजारोहण कोविड केंद्रात रात्रंदिवस सेवा करणाऱ्या सफाई कामगारांचे प्रतिनिधी नितीन जगताप यांचे हस्ते पार पडले आहे.तर स्व.माधवराव आढाव माध्यमिक विद्यालयातील ध्वजारोहण कोरोना योध्या डॉ.गायत्री आहेर (कांडेकर) यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

भारताचे राष्ट्रीय सण अथवा राज्याचे सण यांच्या विशेष दिवशी स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रमुख,उपप्रमुख,सदस्य,प्रमुख अधिकारी,प्रशासकीय अधिकारी,आदींच्या हस्ते करण्याचा पारंपरिक शिरस्ता आहे.त्यात हि संधी बहुदा कोणी सोडताना दिसत नाही.या वरून गावोगाव भांडणे,लढाया,वाद,न्यायालयीन खटले निर्माण झाल्याचे अनेक उदाहरणे आहे.वर्तमानात पत्रात याविषयी अनेक बातम्या वाचकांनी वाचल्या असतील पण या पारंपरिक शिरस्त्याला अपवाद ठरले आहे ते कोपरगाव नगरपरिषदेत सन-२०१६ साली नगरपरिषदेच्या निवडणुकीत राज्यात मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले नगराध्यक्ष विजय वहाडणे.त्यांनी आपल्या सुरुवातीच्या कालखंडापासून या पारंपरिक शिरस्त्याला छेद दिला असून आजपर्यंत दोन वेळा शहीद जवान वीर पत्नी,माजी हवाईदल अधिकारी,स्वच्छता निरीक्षक,कर्मचारी संघटनेचे प्रमुख,नगरसेविका,मुख्याधिकारी,उर्दु शाळा शिक्षिका,शिपाई,शिक्षक आदींना ध्वजारोहण करण्याची संधी देऊन आदर्श पायंडा पाडला आहे.वास्तविक त्यांचा हा स्वतःचा हक्क असताना सामान्य नागरिकांच्या कामाची कदर करून कामाचा गौरव करणे हि बाब आज वर्तमानात विशेष या विशेषणात मोडली पाहिजे.त्यामुळे ते कौतुकाला पात्र ठरले आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते.कोपरगाव नगरपरिषदेच्या या खुर्चीवर अनेक जण आले आणि गेले पण हि कल्पना कोणालाही सुचली नाही.व निव्वळ सुचून उपयोगी नाही वास्तवात आणणे हि बाब कलियुगात खूपच दुर्मिळ मानली पाहिजे.बडे-बडे नेते हि संधी कधी सोडताना दिसत नाही.या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे कार्य नक्कीच शोभून दिसत आहे.निवडणुका जवळ आल्यावर आरोप-प्रत्यारोपांचा गदारोळ दिवसागणिक वाढत जाणार हा प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे.मात्र प्रत्येक नागरिकाला स्वतःला काय अनुभव येतो तो प्रमाण मानला पाहिजे.स्वतःच्या मनाला ग्वाही केले पाहिजे.कोणताही पक्ष,दुसऱ्या पक्षाला व एक नेता दुसऱ्या नेत्याला कधीही चांगले म्हणताना दिसत नाही.मात्र कीर्ती हि सर्वोत्तम मानली पाहिजे जी शत्रूही मुक्तहस्ते करतो आणि या बाबतीत वहाडणे नक्कीच उजवे ठरतात.त्यांनी अजून एक नवीन पायंडा पाडला आहे.तो म्हणजे १९४७ पासून नगरपरिषद स्थापन झाल्यापासून आजपर्यंत जे-जे नगराध्यक्ष होऊन गेले त्या सर्वांच्या छबी त्यांनी उपलब्ध करून त्या त्यांच्या कार्यालयात सन्मानपूर्वक लावल्या आहेत.या बाबतही या सर्व नगराध्यक्षांच्या नातेवाईक व त्यांचे समर्थक यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

नुकत्याच संपन्न झालेल्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्त कोपरगाव नगरपरिषद कार्यालयात झालेले ध्वजारोहण कोविड केंद्रात रात्रंदिवस सेवा करणाऱ्या सफाई कामगारांचे प्रतिनिधी नितीन जगताप यांचे हस्ते पार पडले आहे.तर स्व.माधवराव आढाव माध्यमिक विद्यालयातील ध्वजारोहण कोरोना योध्या डॉ.गायत्री आहेर (कांडेकर) यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
विजय वहाडणे यांनी नगराध्यक्षपदावर आल्यापासून आजपर्यंत २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन,१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व ०१ मे महाराष्ट्र दिना निमित्त अपवाद वगळता दुसऱ्यांनाच ध्वजारोहण करण्याची संधी देऊन सन्मान केला आहे.आजपर्यंत दोन वेळा शहीद जवान वीर पत्नी,माजी हवाईदल अधिकारी,स्वच्छता निरीक्षक, कर्मचारी युनियन प्रमुख,नगरसेविका,मुख्याधिकारी,उर्दु शाळा शिक्षिका,शिपाई,शिक्षक आदींना ध्वजारोहण करण्याची संधी देऊन आदर्श पायंडा पाडला आहे.त्यामुळे हा पायंडा नवीन पदाधिकारी किती दिवस पाळतील हा भविष्यातील प्रश्न गंभीरच मानला पाहिजे.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close