जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

संवत्सर येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

संवत्सर-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे ७२ वा प्रजासत्ताक तथा गणतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला असून यावेळी ग्रामपंचायतीचे प्रशासक श्री वाघेरे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले आहे.

दरम्यान आचारसंहिता लागू असल्याने गावातील नियमित संपन्न होणारी ग्रामसभा यावेळी शासन आदेशाने रद्द करण्यात आली असताना त्याचा काही नव्यांने विरोधी गटात निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना त्याचा थांगपत्ता नसल्याचे उघड झाले असून त्यामुळे गावात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते.भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर इ.स.१९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स.१९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले.जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर इ.स.१९२९ रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी तिरंगा फडकावून पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती.त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते.भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो.हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे.याप्रसंगी विविध मान्यवर नवनिर्वाचित माजी सरपंच ग्रामसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते यावेळी कोणताही शासकीय कार्यक्रम सोडता इतर कार्यक्रम स्थानिक नेत्यांचे मार्गदर्शन आदींना फाटा देण्यात आला होता. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,जनता इंग्लिश स्कूल संवत्सर,नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालय येथील ध्वजारोहणाचे कार्यक्रम संपन्न झाले आहे.याप्रसंगी ग्रामपंचायत निवडणुकीमुळे आचार संहिता लागू असल्याने राजकीय नेत्यांच्या हस्ते हा कार्यक्रम टाळण्यात आला आहे.जिल्हा परीषद शाळा,माध्यमिक शाळा,कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे.दरम्यान आचारसंहिता लागू असल्याने गावातील नियमित संपन्न होणारी ग्रामसभा यावेळी शासन आदेशाने रद्द करण्यात आली असताना त्याचा काही नव्यांने विरोधी गटात निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना त्याचा थांगपत्ता नसल्याचे उघड झाले असून त्यामुळे गावात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close