कोपरगाव तालुका
सुशिलामाई काळे यांचा स्मृतिदिन साजरा

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे संस्थापक कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांना सामाजिक,राजकीय क्षेत्रात खंबीर साथ देवून ग्रामीण भागातील मुलींच्या उच्च शिक्षणासाठी शाळा,महाविद्यालय सुरु करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असणाऱ्या सुशीलामाई काळे यांना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर पुण्यस्मरणानिमित आदरांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे.
यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक जेष्ठ संचालक माजी आ.अशोक काळे,अध्यक्ष आ.आशुतोष काळे,संचालक राजेंद्र मेहेरखांब,कार्यकारी संचालक गिरीश जगताप,भास्करराव काळे,जनरल मॅनेजर सुनील कोल्हे,सेक्रेटरी बाबासाहेब सय्यद,असिस्टंट सेक्रेटरी एस.डी.शिरसाठ,चीफ अकौंटंट एस.एस. बोरनारे, बोरनारे,शेतकी अधिकारी कैलास कापसे आदी मान्यवरांसह विविध विभागाचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.