कोपरगाव तालुका
कोपरगावात मका खरेदीबाबत पुन्हा निर्णय-खुलासा
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाविकास आघाडी सरकारने शासकीय दराने मका खरेदी करण्याचा निर्णय घेवून मका खरेदी केली होती.मात्र सर्व मका उत्पादक शेतकऱ्यांची मका खरेदी करण्यापूर्वीच मका खरेदी केंद्र बंद करण्यात आले होते.त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी मका खरेदी केंद्र पुन्हा सुरु करावी यासाठी आ. आशुतोष काळे यांच्या सुरु असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून शासन ३१ जानेवारी २०२१ पर्यंत १५ लाख १८ हजार क्विंटल मका खरेदी करणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.
मका खरेदी केंद्र बंद केल्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीबाबत पोटतिडकीने व्यथा मांडल्या होत्या.आ.काळे यांच्या पाठपुराव्यातून राज्य शासन किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२०-२१ साठी १५ लाख १८ हजार क्विंटल मका तसेच २ लाख ५० हजार क्विंटल ज्वारी त्याचप्रमाणे ६० हजार क्विंटल पर्यंत बाजरी खरेदी करणार आहे.त्याबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाला आदेश प्राप्त झाले आहेत.
महाविकास आघाडी सरकारने शासकीय दराने शासनाने मका खरेदी करण्याचा निर्णय घेवून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून मका खरेदी केंद्र सुरु केले होते. या मका खरेदी केंद्रावर बहुतांश शेतकऱ्यांनी मका देखील विकली. मात्र काही मका उत्पादक शेतकऱ्यांची मका खरेदी करण्यापूर्वीच हि मका खरेदी केंद्र बंद करण्यात आली होती.मतदार संघात मोठ्या प्रमाणात झालेले मकाचे उत्पादन व शासकीय दराने संपूर्ण मका खरेदी करण्यापूर्वीच बंद करण्यात मका खरेदी केंद्र यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार होते.त्याबाबत आ.काळे यांनी कृषी मंत्री ना. दादा भुसे व मागील आठवड्यात (दि.६) रोजी अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ यांची भेट घेऊन कोपरगाव मतदारसंघात सुरु करण्यात आलेले शासकीय मका खरेदी केंद्र पुन्हा सुरू करावे याबाबत साकडे घातले होते.मका खरेदी केंद्र बंद केल्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीबाबत पोटतिडकीने व्यथा मांडल्या होत्या.आ.काळे यांच्या पाठपुराव्यातून राज्य शासन किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२०-२१ साठी १५ लाख १८ हजार क्विंटल मका तसेच २ लाख ५० हजार क्विंटल ज्वारी त्याचप्रमाणे ६० हजार क्विंटल पर्यंत बाजरी खरेदी करणार आहे.त्याबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाला आदेश प्राप्त झाले आहेत.अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाकडून कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला सूचना येताच तातडीने शासकीय दराने मका खरेदी केंद्रावर मका खरेदी केली जाणार आहे अशी माहिती आ.काळे यांनी दिली आहे.सध्या बाजारात मका, बाजरीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले असून दर घसरल्यामुळे उत्पादन खर्च देखील निघणे अशक्य आहे.अशा स्थितीत आ.काळे यांच्या पाठपुराव्यातून राज्य शासन मका खरेदी करणार असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांची मका विक्री करणे बाकी आहे त्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.